वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून सरपंच बापू आंधळेंना संपवलं; शरद पवार गटाच्या नेत्याचा सनसनाटी दाव

वलमिक कराड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि त्याच्या टोळीतील सदस्य सध्या याच कारागृहात शिक्षा भोगत आहेत. नुकताच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वाल्मिक कराडविषयी एक दावा केल्याने खळबळ उडाली होती. वाल्मिक कराड जेलमधून आजही अ‍ॅक्टिव्ह, माझ्यासमोर व्यक्तीला फोन आला, असे त्यांनी म्हटले होते. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शिवराज बांगर यांनी एक दावा केलाय. सरपंच बापू आंधळेचा (Bapu Andhale) खून वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच झाल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शिवराज बांगर (Shivraj Bangar) यांनी केलाय.

तसेच वाल्मिक कराड हा प्यादा आहे. वाल्मिक कराडच्या मागे धनंजय मुंडे यांची ताकद होती. त्या ताकतीने हे सर्व करून घेतलेलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे असं म्हणू शकत नाही की, हर गलती मे आप हो, हर गुनाह मे आप हो. समाज के गुन्हेगार आप हो. सबके गुन्हेगार आप हो, असं म्हणत बांगर यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

माझे हातपाय तोडताना वाल्मिक कराडला लाईव्ह पाहायचं होतं

माझ्याही खूनाची सुपारी वाल्मीक कराडने दिली होती. माझे हातपाय तोडताना वाल्मिक कराडला लाईव्ह पाहायचे होतं. ज्याला सुपारी दिली त्या सनी आठवलेने खून केला नाही. म्हणून त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवलं, असा आरोपही बांगर यांनी केला. तर परळीतील सरपंच बापू आंधळे खून प्रकरणाचा तपास पुन्हा करून एसआयटी नेमावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत शिवराज बांगर बोलत होते.

बापू आंधळे खून प्रकरण काय?

दरम्यान, 29 जून 2024 रोजी परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे यांचा खून झाला होता.  जुन्या वादातून त्यांची हत्या करण्यात आली होती. परळी शहरामधील बँक कॉलनी भागात त्यांच्यावर गोळीबार झाला होता. या प्रकरणामध्ये बबन गित्ते, मुकुंद गित्ते, महादेव गित्ते, राजाभाऊ निहरकर आणि राजेश वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर परस्पर विरोधी नोंदवण्यात आलेल्या तक्रारीमध्ये मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या प्रकरणात वाल्मिक कराडचा तपासात सहभाग आढळत नाही, म्हणून तपास अधिकाऱ्याने वाल्मिक कराडचे नाव या गुन्ह्यातून कमी केले होते.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Walmik Karad : मोठी बातमी : वाल्मिक कराड जेलमधून आजही अ‍ॅक्टिव्ह, माझ्यासमोर व्यक्तीला फोन आला: अंबादास दानवे

आणखी वाचा

Comments are closed.