Walmik karad wife manjali karad slams manoj jarange patil over santosh deshmukh case
बीड : खंडणी प्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराड सगळीकडून अडकत चालला आहे. कराडवर मकोका लावण्यात आल्यानंतर तो ‘एसआयटी’च्या ताब्यात आहे. सरपंच देशमुख हत्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी बीड जिल्हा न्यायालयानं वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, वाल्मिक कराडला अडकवण्यात येत आहे, असा आरोप त्याची पत्नी मंजली कराड यांनी केला आहे. तसेच, मंजली कराड यांनी मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील यांच्यावरही निशाणा साधला आहे.
मराठा, मराठा काय करतो. मीही 96 कुळी मराठा आहे. आमच्या महाराजांनी, असा जातीवाद करण्यास शिकलं नाही, असं मंजली कराड यांनी म्हटलं. त्या एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधत होत्या.
मंजली कराड म्हणाल्या, “मराठा, मराठा काय करतो. मीही 96 कुळी मराठा आहे. तुम्ही जे काही आरोप करत आहात, ते आधी सिद्ध करा. यांना जातीवाद करायला कोणी शिकवलं. जातीवाद आणि राजकारणात माझ्या नवऱ्याचा बळी दिला जातो आहे. आमच्या महाराजांनी, असा जातीवाद करण्यास शिकवलं नाही. जात बघून खून किंवा गुन्हे होत नाहीत.”
परळीतील दुकाने दुसऱ्या दिवशीही बंद….
वाल्मिक कराडवर मकोका कारवाई झाल्यानंतर मंगळवारी परळी बंद करण्यात आली होती. त्यानंतर परळी शहरातील अनेक दुकानं आजही उघडली नाहीत. शिरसाळा आणि धर्मापुरी गावात कराडवर झालेल्या कारवाईचा निषेधार्थ बंद पाळण्यात आला आहे.
दुकानं बंद ठेवायची हा नवीन पॅटर्न
परळी बंदवर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी भाष्य केले आहे. “हा जातीयवाद नाही, तर चार पाच टक्के लोकांचा गुंडवाद आहे. कोणत्याही गुन्हेगाराला ताब्यात घेतले, तर शहर बंद करणे, दुकानं बंद ठेवायची हा नवीन परळी पॅटर्न आहे. यामुळे व्यापाऱ्यांचेच नुकसान आहे,” असं मत सुरेश धस यांनी मांडलं आहे.
हेही वाचा : ‘त्यांचा’ही हिशोब होणार, बजरंग सोनवणेंचा इशारा
Comments are closed.