Asia Cup: पाकिस्तानचे हे 5 खेळाडू टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरणार? कर्णधार सूर्यकुमार समोर मोठ आव्हान

आशिया कप 2025 (Asia Cup 2025) स्पर्धा अवघ्या काही दिवसात सुरू होणार आहे. 9 सप्टेंबरपासून 8 देशांमध्ये एका ट्रॉफीसाठी तुफानी लढत रंगणार आहे. पण सगळ्यांच्या नजरा 14 सप्टेंबरकडे खिळल्या आहेत, कारण या दिवशी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील महामुकाबला होणार आहे. भारतीय सरकारच्या निर्णयानंतर भारत-पाक सामना रद्द होणार की काय असा प्रश्न निर्माण झाला होता, पण आता ते सगळे ढग बाजूला झाले असून हा सामना निश्चित होणार आहे.

पाकिस्तानकडून फखर जमन हा टीम इंडियासाठी (Team india) सर्वात मोठा धोका ठरू शकतो. फखर एकदा फॉर्मात आला, की त्याला थांबवणं खूप अवघड असतं. त्याचबरोबर शाहीन शाह आफ्रिदीपासूनही भारतीय फलंदाजांना सावध राहावं लागणार आहे. जलद गतीने धावा करण्यासाठी सॅम अय्यूब प्रसिद्ध आहे, तो भारतीय गोलंदाजांना नामोहरम करू शकतो. त्याचप्रमाणे हैरिस रऊफचा वेग आणि स्विंग हेसुद्धा सूर्यकुमार यादवच्या (suryakumar Yadav) संघासाठी मोठं आव्हान ठरू शकतं.

याशिवाय पाकिस्तानच्या संघात इमाम-उल-हक, बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद नवाज यांसारखे खेळाडू आहेत, जे कसोटी सामन्यांप्रमाणेच मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही फरक निर्माण करू शकतात. दुसरीकडे भारतासाठी सूर्यकुमार यादव, शुबमन गिल, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. त्यामुळे 14 सप्टेंबरचा सामना केवळ क्रिकेटमधला एक मोठा संघर्ष नसून, चाहत्यांसाठी भावनांचा उत्सव ठरणार आहे.

Comments are closed.