Wash Basin Cleaning : वॉश बेसिन असे करा चकाचक

वॉश बेसिन स्वच्छ करण्याचे हॅक्स –

शॅम्पू पाऊच –

शैम्पू साचेट

वॉश बेसिन एक रुपयाच्या शॅम्पू पाऊचने स्वच्छ करू शकता. यासाठी वॉश बेसिनमध्ये शॅम्पू टाका आणि घासणीने जिथे डाग पडले आहेत, त्याठिकाणी घासा. तुम्ही काही वेळ शॅम्पू वॉश बेसिनवर लावून ठेवू शकता आणि त्यानंतर घासू शकता. सर्वात शेवटी स्वच्छ पाण्याने वॉशबेसिन स्वच्छ करा, तुम्हाला बेसिन चकाचक झालेले दिसेल.

स्वच्छ करणारा –

क्लिनर – वॉश बेसिन

वॉश बेसिन स्वच्छ करण्यासाठी तुम्ही घरीच क्लीनर तयार करू शकता. यासाठी पाण्यात थोडे इनो मिक्स करा. तयार लिक्विड स्प्रे बॉटलमध्ये भरा. रोज लिक्विडने बेसिनची सफाई करा.

लिंबाचा रस –

लिंबू द्रव

बॉश बेसिनवर जर खूप जास्त हट्टी डाग जमा झाले असतील तर तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता. यासाठी शॅंम्पूमध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब मिक्स करा आणि तयार लिक्विडने वॉश बेसिन स्वच्छ करा.

व्हाइट व्हिनेगर –

पांढरा व्हिनेगर

व्हाइट व्हिनेगर वॉश बेसिनवरील पिवळटपणा दूर करतो. यासाठी व्हाइट व्हिनेगर आणि थोडं पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरून त्यावर फवारा. शेवटी स्वच्छ पाण्याने बेसिन धुवून घ्या.

हायड्रोजन पॅराक्सॉइड –

क्लीनिंग लिक्विड

हायड्रोजन पॅराक्सॉइड वॉश बेसिनवरचा पिवळेपणा घालवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. यासाठी पाणी आणि हायड्रोजन पॅराक्सॉइड समप्रमाणात घ्या आणि डागांवर टाका. 15 ते 20 मिनिटे ब्रशच्या साहाय्याने डाग घासा. शेवटी स्वच्छ पाण्याने बेसिन घासून घ्या.

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर –

बेकिंग सोडा

1 कप बेंकिग सोडा, 1 चमचा व्हिनेगर आणि 1 लिटर पाणी यांचे मिश्रण तयार करून घ्या. तयार मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरा. 5 ते 10 मिनिटे स्प्रे डागांवर फवारून अर्ध्या तासासाठी ठेवा. अर्ध्या तासानंतर वॉश बेसिन स्वच्छ करा.

हेही पाहा –

https://www.youtube.com/watch?v=6kjb2-gqygi

Comments are closed.