प्रियकराकडून शारीरिक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, महिलेनं उचलंल टोकाचं पाऊल
वॉशिम क्राइम न्यूज: वाशिम (Washim) जिल्ह्यातील कारंजा शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने शारीरिक संबंधाची व्हिडिओ (mms ) चित्रफित व्हायरल करण्याची धमकी दिल्याने बदनामीच्या भीतीपोटी एका 40 वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीय. या प्रकरणी कारंजा शहर पोलिसांनी 2 जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
प्रियकर शेख मोबीन शेख वाजीद व त्याचा भाऊ शेख अमीन शेख वाजीद दोघेही रा. दाईपुरा कारंजा ) यांच्याविरुद्ध कलम कलम 108, 351 (3), 352 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यातील आरोपी शेख अमीन शेख वाजीद यास अमरावती येथून अटक केली असून, दुसरा आरोपी फरार आहे. पीडित महिलेसोबत ओळख करून विश्वासात घेत शारीरिक संबंध प्रस्थापित करुन शारीरिक संबंधाचे mms तयार करुन ठेवले होते. वेळोवेळी शारीरिक संबंध करण्यास भाग पाडण्याच्या त्रासाला कंटाळून आणि पोलिसात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याने पीडितिने आत्महत्या केली आहे. पीडितेच्या पतीने पोलिसात घडलेल्या घटनेबाबत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी कारंजा पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Nagpur Crime News : खळबळजनक! नागपुरातील प्रतिष्ठित हॉटेलमध्ये परदेशातील तरुणींकडून नको ते कृत्य; पोलिसांचा छापा, उझबेकिस्तान मधील तरुणीची सुटका
आणखी वाचा
Comments are closed.