शेतकऱ्यांचा संताप, वाशीममध्ये मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला
राज्यात पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्र्यांचे दुष्काळी दौरे सुरू झाले आहेत. दुष्काळी स्थितीचा आघेण्यासाठी वाशीम जिह्यात दाखल झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांच्या रोषास सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांनी ताफा अडवत कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली.
मुख्यमंत्री फडणवीस वाशीम जिह्यातील म्हसला गावात गुरुवारी दुपारी दाखल झाले. यावेळी जमलेल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला. संपूर्ण कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी वाहनातून बाहेर येत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या दुष्काळी परिस्थित शेतकऱ्यांना भरीव मदत करणार आहोत. कर्जमुक्तीच्या यादीत जे वंचित राहिले त्या शेतकऱ्यांनाही कर्जमुक्तीचा लाभ दिला जाईल, असे आश्वासन देत फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या गराडय़ातून आपली सुटका करून घेतली.
शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
अनियमित व पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप हंगामातील हातचे पीक गेले. त्यामुळे बळीराजा आर्थिक विवंचनेत सापडल्याची व्यथा मांडत शेतकऱ्यांना दुष्काळी परीस्थितीतून सावरण्यासाठी सरकारने मदतीचा हात द्यावा, अशी विनवणी शेतकऱ्यांनी केली.
म्हसला येथील शेतकरी देविदास किशन काळे यांच्या शेतात जाऊन शेतातील नुकसानग्रस्त सोयाबीन व तूर पिकाची पाहणी करीत फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
मोहगव्हाण येथील शेतकरी अनिल भगरे, तसेच अब्दुल नईम शेख रहीम यांच्या शेतातील नुकसानाची पाहणी त्यांनी केली.
जऊळका येथील शेतकरी संतोष सखाराम डुंबळे यांच्या शेतीच्या बांधावर जाऊन दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी केली. यावेळी शेतकरी संतोष यांच्या आई शपुंतलाबाई यांनीही दुष्काळी परिस्थितीची पैफीयत मांडली.
Comments are closed.