टीम इंडियाच्या आनंदावर विरजण! स्टार अष्टपैलू खेळाडू वनडे मालिकेतून OUT, नेमकं काय घडलं?

वॉशिंग्टन सुंदर एकदिवसीय मालिकेत: न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला होता. संघाचा प्रमुख विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंत दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला होता. आता त्यानंतर भारतीय संघाचा आणखी एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू वनडे मालिकेतून बाहेर झाल्याने संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. सलग दोन महत्त्वाचे खेळाडू मालिकेतून बाहेर पडणे हे भारतीय संघासाठी मोठा धक्का आहे. विशेषतः या अष्टपैलू खेळाडूच्या अनुपस्थितीमुळे संघाच्या कॉम्बिनेशनवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

पंतनंतर वॉशिंग्टन सुंदरही वनडे मालिकेतून बाहेर

खरंतर, न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यादरम्यान वॉशिंग्टन सुंदर याला साइड स्ट्रेनची दुखापत झाली आणि त्यामुळे तो वनडे मालिकेतून बाहेर झाला आहेत. ऋषभ पंत बडोदा येथे झालेल्या पहिल्या वनडेआधीच दुखापतीमुळे संघ सोडून गेल्यानंतर शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.

पहिल्या डावात सुंदरने पाच षटके टाकली होती. मात्र त्यानंतर सबस्टिट्यूट फिल्डर म्हणून ध्रुव जुरेल मैदानात उतरला आणि सुंदर मैदानाबाहेर गेला. त्यावेळी सुंदर फलंदाजीसाठी येईल की नाही, याबाबत साशंकता होती. पण भारताचे सलग विकेट्स पडू लागल्यानंतर अखेर या अष्टपैलू खेळाडूला मैदानात उतरावे लागले आणि सामना अधिकच रोमांचक झाला. सुंदरने 7 चेंडूत 7 धावा केल्या, मात्र धावा घेताना तो स्पष्टपणे अस्वस्थ दिसत होता. अखेर के. एल. राहुल यांनी सामना भारताच्या बाजूने वळवला आणि टीम इंडियाला मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

राहुलचे वक्तव्य

सामन्यानंतर के. एल. राहुल म्हणाला की, “सुंदरला इतकी मोठी अडचण आहे, याची मला कल्पनाच नव्हती. पहिल्या डावात त्याला थोडी समस्या असल्याचं मला माहीत होतं, पण ती इतकी गंभीर आहे, असं वाटलं नव्हतं. तो चेंडू चांगल्या प्रकारे बॅटने मारत होता. तो फलंदाजीला आला तेव्हा आम्ही जवळपास दर चेंडूला एक धाव या गतीने धावा करत होतो, त्यामुळे धोका घ्यायची गरज नव्हती. त्याच्यावर फारसा दबाव नव्हता. त्याने स्ट्राइक रोटेट केली आणि आपलं काम चोख बजावलं.”

शुभमन गिलने दिली अपडेट

भारतीय वनडे कर्णधार शुभमन गिल यांनी सामन्यानंतर सादरीकरणावेळी सुंदरच्या दुखापतीबाबत माहिती दिली. “वॉशिंग्टन सुंदरला साइड स्ट्रेन झाला आहे. सामन्यानंतर त्याचा स्कॅन होणार आहे,” असं गिल यांनी सांगितलं. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, ऋषभ पंतलाही बडोदा वनडेपूर्वी साइड स्ट्रेनचीच दुखापत झाली होती आणि त्याच्या जागी ध्रुव जुरेलला संघात संधी देण्यात आली होती. मात्र, बीसीसीआयकडून वॉशिंग्टन सुंदरच्या वनडे मालिकेतून बाहेर होण्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, तसेच त्याच्या बदली खेळाडूचं नावही जाहीर करण्यात आलेलं नाही.

हे ही वाचा –

Sophie Devine WPL 2026 : 4,4,6,6,6,6… वर्ल्ड चॅम्पियन गोलंदाजाची धुलाई; सोफी डिव्हाईनच्या खेळीने WPL इतिहास हादरला, नेमकं काय घडलं? पाहा Video

आणखी वाचा

Comments are closed.