बाबरला पुन्हा टी-20 संघात घ्या

पाकिस्तान क्रिकेटला यशाच्या ट्रकवर आणण्यासाठी अनुभवी फलंदाज बाबर आझमला टी-20 आंतरराष्ट्रीय संघात परत आणण्याची गरज निर्माण झाली आहे. अनुभवी खेळाडूची गरज असल्याने आगामी आशिया कप स्पर्धेसाठी बाबरला पाकिस्तानच्या संघात पुन्हा स्थान दिल्यास त्याचा फायदा संघाला नक्कीच होऊ शकतो, असा दावा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने केला आहे. पुढील महिन्यात आशिया कप स्पर्धा रंगणार आहे. डिसेंबर 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यापासून बाबरला टी-20 संघातून वगळले आहे. आशिया कप जवळ येत असताना आणि पाकिस्तान अजूनही या टी-20 क्रिकेटसाठी सर्वोत्तम संघ शोधत असताना पीसीबीने बाबरला पुन्हा संघात समाविष्ट करावे, बाबरकडे परिस्थितीनुसार फलंदाजीला अनुकूल करण्याची क्षमता आहे. जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असल्याने तो जबाबदारी घेऊन खेळू शकतो. त्यामुळे बाबरला संघात घेण्याची विनंती अक्रमने केली आहे.
Comments are closed.