आशिया चषक कोण जिंकणार, भारत की पाकिस्तान?; वसीम अक्रमने लगेच नाव सांगितले!


एशिया कप फायनल इंड वि पीएके: आशिया चषक 2025 च्या स्पर्धेतील (Asia Cup 2025) आज (28 सप्टेंबर) अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak Final Asia Cup 2025) संघात आशिया चषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. याआधी आशिया चषकमध्ये झालेल्या दोन सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे आजच्या अंतिम सामन्यात कोणता संघा बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानच्या अंतिम सामन्याआधी पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू वसीम अक्रमने एक भविष्यवाणी (Wasim Akram Prediction On Ind vs Pak) केली आहे.

पाकिस्तानचे दिग्गज क्रिकेटपटू वसीम अक्रम यांनी आशिया कपच्या अंतिम फेरीसाठी भारताला प्रबळ दावेदार घोषित केले आहे. तर पाकिस्तानी संघ पुन्हा चांगली कामगिरी करेल, असंही वसीम अक्रम म्हणाले. माझ्यासह संपूर्ण जगाने पाहिले आहे की टी-20 च्या सामन्यात काहीही घडू शकते. एक चांगली खेळी किंवा एक चांगले षटक संपूर्ण सामना फिरवू शकतो, असंही वसीम अक्रमने सांगितले.

भारत आणि पाकिस्तानचा सामना अत्यंत चुरशीचा असेल- (Wasim Akram On Ind vs Pak Match)

पाकिस्तानी गोलंदाजांनी भारतीय सलामीवीर फलंदाजांना लवकर बाद केले तर पाकिस्तानी संघ भारताच्या मधल्या फळीला उद्ध्वस्त करू शकतो. विशेषतः अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांच्या लवकर बाद झाल्यामुळे टीम इंडियाला अडचणीत आणता येईल. हा सामना अत्यंत चुरशीचा असेल आणि मला आशा आहे की जो संघ सर्वोत्तम खेळेल तो विजयी होईल, असं वसीम अक्रमने सांगितले.

दुबईची खेळपट्टी आणि अंतिम सामना (IND vs PAK Pitch Report Asia Cup 2025 Final)

आशिया कपच्या 41 वर्षांच्या इतिहासात ही पहिलाच वेळ आहे, जेव्हा भारत-पाकिस्तान अंतिम सामना होते आहे. दुबईची पिच फलंदाज आणि गोलंदाज, दोघांनाही साथ देऊ शकते. चाहत्यांची अपेक्षा आहे की अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि शाहीन आफ्रिदी यांसारखे स्टार खेळाडू आपली छाप नक्कीच उमटवतील.

भारत संघाची संभाव्य प्लेइंग 11- (Ind Probable XI)

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

पाकिस्तान संघाची संभाव्य प्लेइंग 11- (Pak Probable XI)

सलमान अली आगा (कर्नाधर), अबरार अहमद, फखर झमान, हरीस रौफ, हसन अली, खुशदिल शाह, मोहम्मद हरीस (यश्तार रक्षक), मोहम्मद नवाझ, साहिबजादा फरहान, सॅम आयुब, शाहिन शाह आफ्रिदी.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

संबंधित बातमी:

Pathum Nissanka IND vs SL : आई मंदिराबाहेर फुलं विकते, बाप ग्राऊंड बॉय, भारताच्या गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या श्रीलंकेच्या निसांकाच्या गरिबीची भयानक कहाणी

आणखी वाचा

Comments are closed.