दोन्ही देशांच्या खेळाडूंनी मर्यादेत राहावं, आशिया कपमधील IND vs PAK सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा

एशिया कप 2025 वर आयएनडी वि पीएके वर वसीम अक्रॅम: आशिया कपचे दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा आयोजन होत आहे. 2025 मध्ये भारताच्या यजमानीत, मात्र संयुक्त अरब अमिरातीच्या भूमीवर हा थरार रंगणार असून 9 सप्टेंबरपासून सुरुवात होईल. भारत-पाकिस्तानमधील वादानंतर हे नेहमीसारखेच झाले आहे की, दोन्ही देश आपले सामने तटस्थ मैदानावर खेळतात. पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेले ऑपरेशन सिंदूर या दोन घटनांमुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे. याच तणावग्रस्त वातावरणाच्या सावलीत भारत आणि पाकिस्तान यांची 14 सप्टेंबरला आशिया कपमध्ये भिडणार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तानबाबत वसीम अक्रमचं मत

या महत्त्वाच्या सामन्याबाबत पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याने भावनिक अपील केली आहे. त्याने दोन्ही देशांतील खेळाडू आणि चाहत्यांना संयम राखण्याची विनंती केली आहे. “मला खात्री आहे की हा सामना देखील इतर भारत-पाकिस्तान सामन्यांप्रमाणेच रोमांचक ठरेल. माझा विश्वास आहे की दोन्ही देशांचे खेळाडू आणि चाहते आपापल्या मर्यादेत राहतील,” असं वसीम अक्रम सांगितलं. भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंध पाहता त्याने हा सल्ला दिला आहे.

वसीम अक्रम पुढे म्हणाला की, “भारत विरुद्ध पाकिस्तान सामना जगभरातील अब्जावधी लोक पाहतात. त्यामुळे खेळाडू आणि प्रेक्षकांनी संयम व शिस्त दाखवणं महत्त्वाचं आहे.”

कोणता संघ विजेता ठरणार?

क्रिकेटच्या बाबतीत, वसीम अक्रमने कबूल केले की सध्याच्या फॉर्मच्या आधारे भारताला फेव्हरिट मानले जाईल, परंतु सामन्याचा निकाल कोणता संघ दबाव चांगल्या प्रकारे हाताळतो यावर अवलंबून असेल. तो म्हणाला, “जर भारतीयांना त्यांचा संघ जिंकायचा असेल तर पाकिस्तानींनाही अशीच अपेक्षा आहे. अलिकडच्या फॉर्मकडे पाहता, भारताला फेव्हरिट म्हणता येईल, परंतु शेवटी जो संघ दबाव योग्यरित्या हाताळतो तोच जिंकेल.”

बाबर आझमची उणीव भासेल

आशिया कपसाठी निवडलेल्या पाकिस्तानी संघात बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान यांना संधी मिळाली नाही. या पार्श्वभूमीवर वसीम अक्रम म्हणाला, “वैयक्तिकरित्या मला बाबर संघात पाहायला आवडलं असतं. मात्र तो निवडला गेला नाही. आता निवडलेल्या खेळाडूंनी पुढे येऊन उत्तम खेळ दाखवायला हवा.”

सामना कधी आणि कुठे?

भारत विरुद्ध पाकिस्तान हा थरारक सामना 14 सप्टेंबर रोजी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात किमान एक आणि जास्तीत जास्त तीन सामने होऊ शकतात. एक गट स्तरावर निश्चित आहे, सुपर-4 मध्ये दोन्ही संघ पोहोचले तर दुसरा आणि जर दोन्ही संघ अंतिम फेरीत भिडले, तर 15 दिवसांत तब्बल 3 वेळा भारत-पाकिस्तान सामना पाहायला मिळेल.

आणखी वाचा

Comments are closed.