“सचिनचा 100 शतकांचा रेकाॅर्ड मोडू शकतो विराट” माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी
सध्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचा (ICC Champions Trophy 2025) उत्साह शिगेला पोहोचला आहे. तत्पूर्वी भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीची (Virat Kohli) बॅट नुकत्याच झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात चमकली. कोहलीने या सामन्या नाबाद शानदार शतक झळकावले. कोहलीच्या शतकामुळे भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानला धूळ चारली.
दरम्यान कोहलीने वनडे कारकिर्दीतील आपले 51वे आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 82वे शतक झळकावले. कोहली आता जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. दरम्यान, माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने (Wasim Jaffer) एक मोठी भविष्यवाणी केली आहे. भारताचा माजी सलामीवीर आणि मुंबईचा दिग्गज फलंदाज वसीम जाफरचा असा विश्वास आहे की विराट कोहली पुढील 3 ते 4 वर्षे खेळू शकतो आणि महान सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) 100 आंतरराष्ट्रीय शतकांचा रेकाॅर्डही मोडीत काढू शकतो.
सतत संघर्ष केल्यानंतर दुबई येथे झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात भारताने पाकिस्तानवर 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. दरम्यान या सामन्याचा हीरो विराट कोहली ठरला.
वसीम जाफर म्हणाला, “विराट शतकांचा रेकाॅर्ड मोडू शकतो, जेव्हा सचिन तेंडुलकरने 100 शतके ठोकली तेव्हा असे वाटले होते, की ते कोणीही मोडू शकत नाही पण 2010 पासून विराट ज्या पद्धतीने धावा करत आहे, त्यावरून असे दिसते की तो हे अशक्य शक्य करू शकतो, जर विराटने रेकाॅर्ड मोडला तर सचिन तेंडुलकर खूप आनंदी होईल.”
विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने भारतासाठी 123 कसोटी, 299 वनडे आणि 125 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत 123 कसोटी सामन्यात त्याने 9,230 धावा केल्या आहेत. कोहलीने कसोटीत 31 अर्धशतकांसह 30 शतके झळकावली आहेत. 299 वनडे सामन्यात त्याने 58.20च्या सरासरीने 14,085 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 51 शतकांसह 73 अर्धशतके झळकावली आहेत, तर 125 टी20 सामन्यात त्याने 4,188 धावा केल्या आहेत. टी20 मध्ये त्याने 38 अर्धशतकांसह 1 शतक झळकावले आहे. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 122 राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
हार्दिक पांड्या-जास्मिन वालियाच्या नात्याच्या चर्चा! व्हायरल व्हिडिओने वाढवले कुतूहल
इब्राहिम झद्रानने इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक शतक करत मोडले 5 मोठे विक्रम..!
1 डासाच्या आयुष्यापेक्षा कमी वेळेत पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडला
Comments are closed.