वाटद एमआयडीसीची अधिसूचना रद्द करा, कळझोंडी ग्रामसभेत ग्रामस्थांचा ठराव

वाटद एमआयडीसीला दिवसेंदिवस वाढत आहे.वाटद ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेवर बहिष्कार घातल्यानंतर आता कळझोंडी ग्रामपंचायतने वाटद एमआयडीसीची अधिसूचना रद्द करण्याचा ठराव बहुमताने संमत झाला.कळझोंडी ग्रामस्थांनीही वाटद एमआयडीसी विरोधात दंड थोपाटल्यानंतर भूमाफिया आणि दलालांचे धाबे दणाणले आहेत.

वाटद एमआयडीसी शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा सध्या राज्य सरकारचा कुटील डाव आहे.एमआयडीसीच्या नावाखाली शेतकऱ्यांची दोन हजार दोनशे एकर जमीन हडपली जाणार आहे.वाटद एमआयडीसी समर्थनाचा ठराव करण्यासाठी आयोजित केलेल्या वाटद ग्रामपंचायतच्या ग्रामसभेवर ग्रामस्थांनी बहिष्कार घातला होता.त्यापाठोपाठ कळझोंडी ग्रामपंचायतने ग्रामसभेत वाटद एमआयडीसीची अधिसूचना रद्द करण्यााचा ठराव केला.

17 ऑगस्टचा चाकरमान्यांचा एल्गार

स्थानिक शेतकऱ्यांनी एमआयडीसी विरोधात लढाई सुरू केल्यानंतर मायभूमीसाठी चाकरमानीही मैदानात उतरणार आहेत. 17 ऑगस्टला दादर येथे चाकरमानी आंदोलन करणार आहेत.या जनसंवाद सभेला मानवाधिकार विश्लेषक ॲड.असीम सरोदे मार्गदर्शन करणार आहेत.

Comments are closed.