पहा: Dewald Brewis ने 1 षटकात घेतले दोन अप्रतिम झेल, हे पाहून तुम्ही पण म्हणाल WOW

लक्ष्याचा पाठलाग करताना एमआयच्या डावात कॉर्बिन बॉशने गिडॉन पीटर्सने टाकलेल्या नवव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डीप मिडविकेटवर धावताना बाऊंड्री लाइनवर शानदार झेल घेतला. यानंतर षटकाच्या पाचव्या चेंडूवर करीम जनातनेही डीप मिडविकेट भागात शॉट खेळला. सीमारेषेवरून पुढे धावत आलेल्या ब्रेव्हिसने पुढे डायव्हिंग करत उत्कृष्ट झेल घेतला. ब्रेविसच्या या शानदार क्षेत्ररक्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

याआधी फलंदाजी करताना ब्रेविसने 19 चेंडूत 34 धावांची खेळी केली. मात्र, सध्याच्या मोसमात ब्रेव्हिसची कामगिरी फारशी खास राहिलेली नाही.

विशेष म्हणजे या सामन्यात कॅपिटल्सने केपटाऊनचा ५३ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण मिळाल्यानंतर कॅपिटल्सने 6 गडी गमावून 185 धावा केल्या. ज्यामध्ये शेरफेन रदरफोर्डने 27 चेंडूत 53 धावांची खेळी केली.

केपटाऊनकडून कागिसो रबाडाने 2, जॉर्ज लिंडे-ट्रेंट बोल्ट, कर्णधार राशिद खान आणि करीम जनातने प्रत्येकी 1 बळी घेतला.

प्रत्युत्तरात केपटाऊनचा संघ 7 विकेट गमावून केवळ 132 धावा करू शकला. रीझा हेंड्रिक्सने 50 चेंडूत नाबाद 68 धावा केल्या, पण अन्य कोणताही खेळाडू त्याच्यासोबत क्रीझवर टिकू शकला नाही.

Comments are closed.