मांजरा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू; सहा वक्र दरवाजे उघडले

रेन-अपडेट-मंजारा-डॅम-इरिसेस-वॉटर-रिलीझ-ओपन-ओपन -6-गेट्स-बाय -0-25 मीटर

मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी बुधवारी रात्री 11 वाजता गेट क्रमांक 3, 4, 2 व 5 (हे 4 गेट) 0.25 मीटरने उघडण्यात आले आहेत. सध्या एकूण सहा दरवाजे उघडले आहेत.

सद्यस्थितीत मांजरा धरणाच्या सांडव्याची 6 वक्रद्वारे (क्र.1,2,3,4, 5 व 6) 0.25 मीटर ने उघडली असून मांजरा नदीपात्रात 5241.42 क्युसेक्स (148.44क्युमेक्स) इतका विसर्ग सूरू आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवण, कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येणार आहे. नदी काठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.