शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उजेड गावात पाणी शिरले; 24 तासांपासून वाहतूक बंद

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे उजेड गावात मांजरा नदीचे पाणी शिरले आहे. मागील 24 तासापेक्षा अधिक काळापासून निलंगा वाहतूक बंद करण्यात आली आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे उजेड परिसरातील मांजरा नदीच्या काठावर असलेल्या गावांमध्ये पुर परिस्थीती आहे. उजेड गावात नदीचे पाणी शिरले आहे. मागील 24 तासापेक्षा अधिक काळापासून निलंगा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गावातील कांहीं घरांमध्ये, वस्तीत पाणी शिरले. नागरिकांना जिल्हा परिषद शाळेत राहण्यासाठी जावे, असे तहसील, ग्रामपंचायत कार्यालयातून सांगण्यात आले होते. परंतु नागरिकांनी गावातील इतरांच्या घरात राहणे पसंद केले. आणखी दोन तासानंतर पाणी ओसरेल असे सांगितले जात आहे.

Comments are closed.