बॅगेज बेल्टवरील पाण्याची गळती तातडीने दुरुस्त
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला सहा महिन्यांत गळती लागल्याची चर्चा होत असताना आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाने याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, १७ जून २०२६ रोजी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॅगेज बेल्ट क्रमांक ५ आणि ६ जवळ पाणी गळतीची एक किरकोळ घटना निदर्शनास आली आणि ती त्वरित नियंत्रित करण्यात आली. संबंधित परिसर सुरक्षित करण्यात आला, बॅगेज हाताळणीचे कामकाज विनाअडथळा पर्यायी बेल्टवर हलवण्यात आले आणि विमानतळाचे कामकाज कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू राहिले. ही समस्या ३० मिनिटांच्या आत पूर्णपणे सोडवण्यात आली आणि ती छतावरून होणाऱ्या गळतीशी संबंधित नव्हती, असे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.
Comments are closed.