तिसऱ्या कटककर करंडक अखिल भारतीय आंतर क्लब वॉटर पोलो स्पर्धेत सेंट्रल रेल्वे, इंडियन एअरफोर्स, डेक्कन जिमखाना, त्रिवेंद्रम इलेव्हन संघांचे विजय

पुणे, 19 फेब्रुवारी 2026: – आॅलिंपिक स्पोर्टस असलेल्या वाॅटरपोलोला प्रोत्साहन देण्यासाठी डेक्कन जिमखान्या यांच्या तर्फे आयोजित तिसऱ्या कटककर करंडक अखिल भारतीय आंतर क्लब वॉटर पोलो स्पर्धेत साखळी फेरीत सेंट्रल रेल्वे, इंडियन एअरफोर्स(भारतीय वायुसेना), डेक्कन जिमखाना, त्रिवेंद्रम इलेव्हन या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव केला.
डेक्कन जिमखान्याच्या टिळक तलावावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात डेक्कन जिमखाना संघाने अमरावती संघाचा 10-7 असा पराभव केला. डेक्कन जिमखाना संघाकडून विराज ढोकळे 2, पियुष सूर्यवंशी 2, प्रियेश कराळे 2, बाळासाहेब भिसे 1, प्रयाग जैस्वाल 1, विनायक कार्लेकर 1, श्रीरंग बनकर 1 यांनी सुरेख कामगिरी केली. दुसऱ्या सामन्यात साऊथ रेल्वे(दक्षिण रेल्वे) संघाने डेक्कन जिमखाना संघाचा 15-04 असा पराभव केला.
अन्य लढतीत सिबिन व्ही 4, प्रवीण 2, नितेश यूएन 1, सिद्धार्थ एमएस 1 यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर इंडियन एअरफोर्स(भारतीय वायुसेना) संघाने अमरावती संघाचा 8-6 असा पराभव करून आपली विजयी मालिका कायम ठेवली. अन्य लढतीत सेंट्रल रेल्वे(मध्य रेल्वे) संघाने साऊथ(दक्षिण रेल्वे) संघाचा 11-9 असा पराभव करून चौथ्या विजयाची नोंद केली.
निकाल: साखळी फेरी:
डेक्कन जिमखाना: 10(विराज ढोकळे 2, पियुष सूर्यवंशी 2, प्रियेश कराळे 2, बाळासाहेब भिसे 1, प्रयाग जैस्वाल 1, विनायक कार्लेकर 1, श्रीरंग बनकर 1) वि.वि.अमरावती: 7(समर्था मोहतुरे 3, अश्विन कलोटी 1); सामनावीर – प्रियेश कराळे;
त्रिवेंद्रम इलेव्हन: 11(इरफान मोहम्मद 5, आनंद सतीश 2, आदर्श व्हिएस 1, किरण एस 1, कृष्णन यादव 1,
विसाळ व्हि 1) वि.वि.रिलायन्स रायगड: 6(प्रेम पाटील 2, साहिल कुटे 2, दिनांशू कुटे 1, श्रावण इंद्रे 1); सामनावीर – इरफान मोहम्मद;
सेंट्रल रेल्वे(मध्य रेल्वे): 23(ऋतुराज बीडकर 3, रोहीत बीएस 3) वि.वि.इंडियन एअरफोर्स(भारतीय वायुसेना): 22(वेदांत 1, कल्पेश 1, कृष्णलाल 1, नितेश यूएन 1,
मोन्जिथ एमएम 1, श्रीजीथ एसके 1); सामनावीर – मनोज;
साऊथ रेल्वे(दक्षिण रेल्वे): 15(अभिनव एएम 5, आदर्श बीएस 5, आदित्यन एबी 3, अभिलाष आर 1, अंबाडी एनएस 1) वि.वि.डेक्कन जिमखाना: 4 (पीयूष सूर्यवंशी 2, वैष्णव महाडिक 1, विनायक कार्लेकर 1); सामनावीर – अभिनव ए;
वेस्टर्न रेल्वे(पश्चिम रेल्वे): 14(मनीष खोमणे 4, अर्जुन कावळे 3, करण शुक्ला 3, भूषण पाटील 1, श्रेयस वैद्य 1, सारंग वैद्य 1, आदित्य थिटे 1) वि.वि.रिलायन्स रायगड: 2 (सर्वेश माने 1, प्रेम पाटील 1); सामनावीर – मनीष खोमणे;
इंडियन एअरफोर्स(भारतीय वायुसेना): 8 (सिबिन व्ही 4, प्रवीण 2, नितेश यूएन 1, सिद्धार्थ एमएस 1) वि.वि.अमरावती: 6 (जयेश वानखडे 2, अश्विन कलोटी 2, समर्थ मोहतुरे 1, शौर्य साहू 1); सामनावीर – जयेश वानखेडे;
सेंट्रल रेल्वे(मध्य रेल्वे): 11(ऋतुराज बीडकर 3, अफसल नवस 1, रोहित बीएस 1, पार्थ अंबुलकर 1) वि.वि.साऊथ(दक्षिण रेल्वे): 9(आदर्श बीएस 4, अंबाडी एनएस 1, आकाश व्ही 1); सामनावीर – ऋतुराज बीडकर
Comments are closed.