बेस्टचं अधःपतन आम्ही सहन करु शकत नाही; बेस्ट दरवाढीला आदित्य ठाकरे यांचा विरोध

बेस्ट उपक्रमाने सरासरी तिकिटात आणि पासमध्ये सरसकट दुपटीने वाढ करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे साध्या बेस्ट बसचे कमीत कमी प्रवासभाडे हे 10 रुपये होणार आहे. तर एसी बसचे तिकीट 6 रुपयांवरून 12 रुपये होणार आहे. याचा फटका बेस्टने प्रवास करणाऱ्या 31 लाख 50 हजार प्रवाशांना बसणार आहे. आधीच महागाईने होरपळलेल्या मुंबईकरांना आता बेस्ट भाडेवाढीची झळही बसणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी बेस्टच्या दरवाढीला विरोध केला आहे. लाखो मुंबईकरांना सेवा देणाऱ्या बेस्टचं हे अधःपतन आम्ही सहन करु शकत नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
बेस्ट दरवाढीला विरोधात त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मुंबईतील सामान्य माणसाची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बससेवेकडे सत्ताधाऱ्यांकडून गेल्या २-३ वर्षांत मुद्दाम दुर्लक्ष केलं जातंय. आता तर बेस्टची दुप्पट दरवाढ करण्याची बातमी आलीये. सामान्य मुंबईकरांचं रोजचं जगणंच कठीण व्हावं असाच सत्ताधाऱ्यांचा विचार दिसतोय. जगातील सर्वात स्वस्त शहरी बससेवा अशी ओळख असलेल्या आणि लाखो मुंबईकरांना सेवा देणाऱ्या बेस्टचं हे अधःपतन आम्ही सहन करु शकत नाही. बेस्ट दुप्पट दरवाढीला आमचा विरोध आहे! बेस्ट बसेसची संख्या आधीच रोडावलीये, महत्वाचे मार्ग बंद केलेत, आता जर दरवाढही केली तर बेस्टवर त्याचा विपरीत परिणाम होईल. आमची ठाम मागणी आहे, इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढवा,बेस्टचा दर्जा सुधारा आणि मुंबईकरांना चांगली सेवा द्या! बेस्ट वाचवा!
मुंबईतील सामान्य माणसाची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बससेवेकडे सत्ताधाऱ्यांकडून गेल्या २-३ वर्षांत मुद्दाम दुर्लक्ष केलं जातंय. आता तर बेस्टची दुप्पट दरवाढ करण्याची बातमी आलीये. सामान्य मुंबईकरांचं रोजचं जगणंच कठीण व्हावं असाच सत्ताधाऱ्यांचा विचार दिसतोय. जगातील सर्वात स्वस्त शहरी…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) 28 एप्रिल, 2025
मुंबईकरांना चांगली सेवा देण्यासाठी इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढवा, बेस्टचा दर्जा सुधारा आणि मुंबईकरांना चांगली सेवा द्या! बेस्ट वाचवा, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
Comments are closed.