होय आम्ही आई बाबा होणार! कतरिना कैफने इन्स्टाग्रामवर केली आनंदाची बातमी जाहीर

गेल्या काही दिवसांपासून कतरिना कैफकडे गूड न्यूज असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकत होत्या. अखेर या बातमीवर दस्तुरखुद्द कतरिना आणि विकी कौशल या दोघांनी शिक्कामोर्तब केले आहे. माध्यमातील बातम्यांवर दोघांनीही मौन बाळगले होते. परंतु आता इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत दोघांनीही ते आई बाबा होणार असल्याचे जाहीर केले आहे.

आम्ही दोघेने आनंदी आणि कृतज्ञ असून, आमच्या आयुष्यातील एक नवा अध्याय लवकरच सुरु करणार आहोत असे कतरिनाने पोस्टमध्ये म्हटले आहे.

कतरिना आणि विकीचे चाहते ज्या दिवसाची वाट पाहत होते तो अखेर आला आहे.  कतरिना कैफ आणि विकी कौशल आई बाबा होणार म्हणून त्यांचे चाहते आधीच आनंदी होते. त्याच उत्साहात भर घालत आता या दोघांनीही या बातमीला शेअर केले आहे. कतरिना आणि विकीचा एक फोटो देखील समोर आला आहे. या फोटोमध्ये कतरिना गर्भवती असल्याचे दिसत आहे.

Comments are closed.