… तर आम्ही त्यांना इस्रायलविरुद्ध क्षेपणास्त्रे देऊ! अमेरिका, इस्रायल इराण युद्धात किम जोंग उन यांची उडी
अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा आज चौथा दिवस आहे. तसेच हे युद्ध कमीतकमी चार आठवडे चालेल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हा लष्करी संघर्ष अंतहीन राहणार नाही आणि वर्षानुवर्षे चालणार नाही, असे म्हटले आहे. आता या युद्धाची व्याप्ती वाढत असून उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी महत्त्वाचे विधान करत या युद्धात उडी घेण्याचे संकेत दिले आहेत.
इराणने विनंती केली तर आम्ही त्यांना इस्रायलविरुद्ध क्षेपणास्त्रे देऊ. इस्रायलला नष्ट करण्यासाठी आमचे एक क्षेपणास्त्र पुरेसे आहे, असे किम जौंग म्हणाले. आमचे अनेक नागरिक इराणमध्ये अडकले आहेत. त्यांच्या परतण्याबाबत तडजोड होऊ शकत नाही. त्यांच्यापैकी एकालाही इजा झाली तर मी कोणताही संकोच न करता युद्धात सामील होईन, असा इशाराही किम जोंग उन यांनी अमेरिका आणि इस्रायलला दिला आहे.
इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे लष्करी हल्ले होत असताना किम जोंग उन यांनी शस्त्रास्त्रे उत्पान वाढवत अण्वस्त्रांच्या प्रयत्नांना बळकटी देण्याचे आवाहन केले आहे. इराणकडे अण्वस्त्रे नसल्याने त्यांच्यावर असा हल्ला झाला आहे, असेही ते म्हणाले. तसेच इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या कारवाईचा उत्तर कोरियाकडून निषेध करण्यात आला होता. तसेच आता किम जोंग उन यांनी युद्धात उडी घेण्याचे संकेत दिल्याने जगाची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
Comments are closed.