प्रधानांचा राजीनामा घेणारच, आता मागे हटणार नाही! आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात ‘जेन-झी’चे छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर तिरंगा आंदोलन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दिल्लीत विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीहल्ला करणाऱ्या जुलमी मोदी सरकारविरोधात संपूर्ण देशात असंतोषाची आग भडकली असून मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आज जेन झींचे तुफान आले. तिरंग्याची जबरदस्त ताकद देशाने पाहिली. हजारो तरुणांनी राष्ट्रध्वजाच्या साक्षीने एकसुरात राष्ट्रगीत गाऊन देशाच्या भवितव्यावर आलेले संकट एकजुटीने दूर करण्याचा निर्धार केला. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. ‘सोनम वांगचुक यांचे उपोषण संपले पण तरुणांचे आंदोलन सुरूच राहणार. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही,’ असे यावेळी आदित्य ठाकरे यांनी ठणकावले.

Comments are closed.