इराण झाला आणखी आक्रमक, शरण येण्याच्या अमेरिकेच्या धमकीला प्रत्युत्तर देत म्हणाला….

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून अमेरिकेने दिलेल्या शरणागतीाच्या धमकीला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अमेरिकेने घातलेल्या जाचक अटी आणि निर्बंधांना पूर्णपणे फेटाळून लावत, इराण कोणत्याही दबावापुढे झुकणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. एका बाजूला अमेरिकेला ठणकावून सांगतानाच इराणने आपल्या शेजारील राष्ट्रांवर झालेल्या हल्ल्यांबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.

इराणी टीव्हीवर केलेल्या भाषणात इराणचे अध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्कियान म्हणाले आहेत की, “मी शेजारच्या देशांची माफी मागतो. इतर देशांवर आक्रमण करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता.” मात्र ही मवाळ भूमिका केवळ शेजारी राष्ट्रांसाठी असून अमेरिकेच्या संदर्भात इराणने आपले धोरण अधिक कडक केले आहे.

अमेरिकेने इराणवर लष्करी आणि आर्थिक निर्बंध लादताना काही अटी मान्य करून शरण येण्याची धमकी दिली होती. यावर भाष्य करताना पेझेश्कियान म्हटले की, “अमेरिका आणि इस्रायलसमोर शरणागती पत्करणार नाही.” ते म्हणाले आहेत की,”इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी, अशी इच्छा शत्रूंनी व्यक्त केली आहे. त्यांची इच्छा त्यांच्याबरोबरच त्यांच्या थडग्यात पुरली जाईल.”

Comments are closed.