Weather Update Change in weather in Maharashtra warning of heavy rain Alert for 11 districts vvp96


मुंबई : मुंबईसह राज्यभरातील वातावरणात मागील काही दिवसांपासून सातत्याने बदल पाहायला मिळत आहेत. सध्या डिसेंबर हा थंडीचा महिना सुरू असला तरी, वातावरणातील बदलांमुळे मुंबईतील हवा प्रदूषित झाली असून, थंडी गायब झाली आहे. एकिकडे प्रदूषित वातावरण तर, दुसरीकडे आता हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार, 28 डिसेंबर रोजी वादळी वाऱ्यासह, विजांसह पावसाची शक्यता हवामान खात्याने दिला आहे. तसेच हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला असून दक्षतेचा इशारा दिला आहे. (Weather Update Change in weather in Maharashtra warning of heavy rain Alert for 11 districts)

हवामान विभागाच्या माहितीनुसार, सद्यस्थितीत राज्यातील 11 जिल्ह्यांत पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. शिवाय, 12 ते 13 जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, राज्यात पुढील काही दिवस पावसासाठी पोषक वातावरण असल्यामुळे 29 डिसेंबरपर्यंत उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जवळपास 11 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

– Advertisement –

सध्या बदलत असलेल्या वातावरणाचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसताना पाहायला मिळत आहे. बोरिवली, मालाड, नेव्ही नगर, माहागाव, देवनार येथील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा अतिवाईट श्रेणीत गणली गेली. याशिवाय, शनिवारी पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता राहणार आहे. या परिसरात गारपीटीसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय, रविवारी विदर्भ आणि मराठवाड्यातली काही तुरळक ठिकाणी राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर राहणार आहे.

राज्यातील नाशिक जिल्ह्यात सुद्धा पावसाने हजेरी लावल्याची माहिती समोर आली आहे. निफाड, पिंपळगाव भागात दमदार पाऊस झाला असून, मनमाड शहर परिसरासह येवला तालुक्यातील अनेक भागाला जोरदार पावसाने झोडपून काढले. परिणामी हिवाळ्यात झालेल्या या अवकाळी पावसाचा फटका रब्बीच्या हंगामातील सर्वच पिकांना बसण्याची भीती द्राक्ष व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सतावत आहे.

– Advertisement –

अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने हरभरा, गहू, तूर, कापूस पिकाचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. या अवकाळी पावसाने शेतकरी संकटात सापडला आहे.


हेही वाचा – Accident : पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी; अपघाताचे कारण…



Source link

Comments are closed.