Weather Update Citizens beware, IMD warns of climate change PPK
राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये हवामानात बदल पाहायला मिळत आहे. ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. दिवसभर दमट आणि उष्णतेचे वातावरण असताना रात्री कुडकुडवणारा गारठा, यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
मुंबई : राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये हवामानात बदल पाहायला मिळत आहे. ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. दिवसभर दमट आणि उष्णतेचे वातावरण असताना रात्री कुडकुडवणारा गारठा, यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. ज्यामुळे आजाराचेही प्रमाण वाढले आहे. त्यानंतर आता हवामान विभागानेही पुन्हा वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा येत्या काही तासात पुढे सरकणार आहे. त्यामुळे पूर्व-इशान्येकडील राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. याचाच परिणाम महाराष्ट्राच्या तापमानावर होणार असून पुढील दोन दिवसात राज्यात काही भागात पावसाची शक्यता आहे. (Weather Update Citizens beware, IMD warns of climate change)
गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी तापमानात सुद्धा वाढ झालेली पाहायला मिळत आहे. परंतु, असे असले तरी हवामानाच्या बदलामुळे विदर्भात 24 आणि 25 डिसेंबर रोजी हलक्या आणि मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता आहे. तसेच, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही याचा परिणाम पाहावयास मिळू शकतो. यामुळे या दोन्ही भागांमध्ये आर्दता वाढणार असून काही भागात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर शनिवारी मध्य व उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान 15 ते18 अंशांपर्यंत गेले होते. पुण्यात थंडीचा कडाका कमी झाला असून शनिवारी 13-18 अंश तापमान होतं. मराठवाड्यात बहुतांश भागात गारठा कायम असला तरी किमान तापमान वाढले आहे.
– Advertisement –
राज्यात किमान तापमानात वाढ झाली असून तापमानाचा पारा काहीसा वाढला आहे. मुंबईत सुद्धा कुलाबा आणि सांताक्रूझमध्ये किमान तापमान 20 अंशांवर गेले होते. तर 10 अंशाखाली तापमान गेलेल्या नाशकात 12 ते 18 अंशांची नोंद करण्यात आली. नगरमध्ये 13 अंश तर, सांगली, सातारा, सोलापूरमध्ये 16 ते 18 अंश तापमान नोंदवले गेले आहे. उत्तर महाराष्ट्रात नंदूरबार, चंद्रपूर, गोंदिया, धुळ्यात किमान तापमानाचा पारा 15 ते 19 अंश होता. कोरड्या वाऱ्यांचा झोत महाराष्ट्राकडे असल्याने राज्यात गारठा जाणवत असून पहाटे दाट धुकं आणि कडाक्याची थंडी आहे.तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची तीव्रता वाढल्याने येत्या दोन दिवसात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे.पूर्व व पश्चिम विदर्भात हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे.
Comments are closed.