Weather Update – मुंबईकरांची लाहीलाही; उकाड्याबरोबर प्रदूषण चिंताजनक पातळीवर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई शहरातील प्रदूषण मंगळवारीही चिंताजनक पातळीवरच राहिले आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) अद्याप समाधानकारक श्रेणीत पोहोचलेला नाही. हवेत धुलीकणांचे प्रमाण उच्च पातळीवरच आहे. या प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच तापमानाने कहर करण्यास सुरुवात केली आहे. दिवसभरात कमाल तापमानाचा पारा 34 ते 35 अंशांच्या आसपास नोंदवण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. एकीकडे तापमानवाढ आणि दुसरीकडे प्रदूषण यामुळे मुंबईकरांची प्रचंड लाहीलाही झाली आहे.

वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसांचे विकार, दमा आणि हृदयरोग असलेल्या लोकांना श्वसनाचा त्रास संभवतो. लहान मुलेस वृद्ध नागरिक आणि श्वसन किंवा हृदयासंबंधी आजार असलेल्यांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, आवश्यक ती खबरदारी घ्या असा सल्ला देण्यात आला आहे.

संपूर्ण मुंबई शहर व आसपासच्या परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक

  • वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स – 138
  • बोरिवली पूर्व – 108
  • भायखळा – 88
  • अंधेरी पूर्व – १३६
  • कुलाबा – 87
  • देवनार – 137
  • घाटकोपर – 122
  • कांदिवली पश्चिम – 118
  • भांडुप पश्चिम – 101
  • मालाड पश्चिम – 120
  • माझगाव – 92
  • मुलुंड पश्चिम – 101
  • शिवडी – 102
  • ठाणे – 111
  • कल्याण – 108
  • नवी मुंबई – 118

Comments are closed.