सचिनच्या घरी लग्नाची लगबग! अर्जुन आणि सानियाला आशीर्वाद देण्यासाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रण
भारताचा महान क्रिकेटपटू सचिन (Sachin Tendulkar son arjun Tendulkar) तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अर्जुन आणि सानिया यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या, ज्यावर आता स्वतः सचिनने शिक्कामोर्तब केले आहे. सचिनने 10 फेब्रुवारी (मंगळवार) रोजी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांना अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण दिले.
सचिनने सोशल मीडियाद्वारे स्वतः ही माहिती दिली आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने मंगळवारी आपल्या कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी सचिनसोबत त्याची पत्नी अंजली, मुलगा अर्जुन, मुलगी सारा आणि अर्जुनची होणारी पत्नी सानिया देखील उपस्थित होती. सचिनने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पंतप्रधान मोदींसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
हा फोटो शेअर करताना सचिनने लिहिले, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना अर्जुन आणि सानियाच्या लग्नाचे निमंत्रण देताना आम्हाला खूप आनंद होत आहे. मोदीजी, या तरुण जोडप्याला दिलेल्या आशीर्वादाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल तुमचे मनापासून आभार.
पंतप्रधानांच्या भेटीपूर्वी सचिनने काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली होती. सचिन आणि पत्नी अंजली यांनी सोनिया गांधींच्या ’10 जनपथ’ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.
Comments are closed.