साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 03 ऑगस्ट 2025 ते शनिवार 9 ऑगस्ट 2025
>> नीलिमा प्राचार्य
जाळीदार अनुभव उपयोगी ठरेल
चंद्र, शुक्र प्रतियुती, मंगळ प्लुटो त्रिकोणयोग. कोणत्याही विषयाची टिकाटिप्पणी करताना काळवेळाचे भान ठेवा. तणाव वाढेल. नोकरीमध्ये दबाव, वाद होईल. यश मिळेल. जुन्या अनुभवाचा उपयोग करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात क्षुल्लक चूकसुद्धा मोठी होऊ शकते. तुमच्या डावपेचांचे चुकीचे उदात्तीकरण केले जाईल.
चांगला दिवस 6, 7
वृषभ – नोकरीत काम वाढेल
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र बुध प्रतियुती. कठीण कामे करून घ्या. क्षुल्लक कारणाने विचलित होण्याची गरज नाही. एकाग्रता ठेवा. यश मिळेल. नोकरीत काम वाढेल. वरिष्ठ सहाय्य करतील. धंद्यात आळस नको. तत्परता ठेवा. वसुली होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नव्या योजना मार्गी लागतील. कौतुक होईल.
चांगला दिवस 3, 4
मिथुन – वादाचे प्रसंग येतील
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र, शुक्र प्रतियुती. किरकोळ वादाचे प्रसंग निर्माण होतील. संयम ठेवल्यास समस्या वाढणार नाही. दूरदृष्टिकोन, मधुरवाणी ठेवा. यश खेचता येईल. नोकरीत दबाव राहील, पण वर्चस्व वाढेल. राग वाढवू नका. कुणालाही कमी लेखू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात क्षुल्लक कारणावरून वाद वाढतील. तुमचे भाषण प्रभावी ठरेल.
चांगला दिवस 6, 7
कर्करोग आत्मविश्वास वाढेल
चंद्र, बुध प्रतियुती, मंगळ, प्लुटो त्रिकोणयोग. आत्मविश्वास वाढेल. विश्वास असलेल्या व्यक्तीकडून मदत मिळणे कठीण होईल. अनाठायी खर्च टाळा. नवीन परिचयाच्या मोहात अडकू नका. फसगत होईल. नोकरीमध्ये यश मिळेल. धंद्यात सावध रहा. व्यवहारात लक्ष द्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कारवाया होतील.
चांगला दिवस 3, 4
सिंह – कायदा पाळा
चंद्र, गुरू प्रतियुती, चंद्र, मंगळ केंद्रयोग. क्षेत्र कोणतेही असो चौफेर सावध रहा. कायद्याला धरून वक्तव्य करा. मानापमाचा प्रश्न वाढवू नका. समस्या वाढेल. प्रेमाने व कौशल्याने प्रसंगाला सामोरे जा. योग्य गुरू, चांगला हितचिंतक मित्र तुम्हाला सहाय्य करेल. नोकरी टिकवा. धंद्यात लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप होतील.
चांगला दिवस 6, 7
कन्या प्रत्येक दिवस महत्त्वाचा
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र, बुध प्रतियुती. प्रत्येक दिवस महत्त्वाचा, उत्साहाचा व आत्मविश्वासाचा आहे. राग वाढू देऊ नका. नोकरीत महत्त्वाचे काम करून दाखवाल. धंद्यात नवा विचार मिळेल. जम बसेल. वसुली करा. कर्जाचे काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विचारांना, कार्याला योग्य चालना मिळेल. लोकप्रियता वाढेल.
चांगला दिवस 3, 4
तूळ – कामात यश मिळेल
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र बुध प्रतियुती. प्रत्येक दिवस यश देणारा ठरेल. क्षुल्लक कारणाने संताप करू नका. अनेक दिग्गज व्यक्तींचा परिचय होईल. नोकरीत महत्त्वाच्या कामात यश मिळेल. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नव्याने कार्यारंभ करता येईल. योजना पूर्ण करा. वरिष्ठांची मर्जी राहील.
चांगला दिवस 5, 6
वृश्चिक – यश प्राप्त करता येईल
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र, बुध प्रतियुती. कठीण प्रसंगांवर मात करून यश खेचता येईल. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. नव्या परिचयावर जास्त विश्वास ठेवू नका. क्षेत्र कोणतेही असो मार्ग शोधता येईल. नोकरीत कारस्थाने होतील. तरीही कामात प्रगती होईल. धंद्यात फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मित्र, शत्रू ओळखता येतील.
चांगला दिवस 6, 7
धनु – कायद्याला धरून वागा
सूर्य, चंद्र षडाष्टक योग, चंद्र, शुक्र प्रतियुती. सप्ताहाच्या सुरुवातीला समस्या येईल. कायद्याला धरून वागा. नोकरीत आरोप होतील. प्रश्न सोडवा. धंद्यात वादाला महत्त्व देऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांच्या विरोधात जाऊ नका. तुमच्या कार्यात अडचणी येतील. बोलणे मैत्रीपूर्ण ठेवा. गुप्त डावपेच खेळले जातील.
चांगला दिवस 8, 9
मकर ओळख फसवी ठरेल
चंद्र, बुध त्रिकोणयोग, मंगळ, शनि प्रतियुती. मैत्रीत, नात्यात मतभेद होतील. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. धंद्यात मोह नको. नवीन ओळख फसवी ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. मोठेपणा देऊन तुमच्याकडून मोठय़ा फायद्याची अपेक्षा ठेवली जाईल. व्यवहारात सतर्क रहा. फसगत टाळा.
चांगला दिवस 3, 4
कुंभ – प्रकृतीची काळजी घ्या
सूर्य, चंद्र षडाष्टक योग. मंगळ, शनि प्रतियुती. वाहनापासून धोका होण्याची शक्यता. प्रकृतीची काळजी घ्या. कोणताही वाद टोकाला नेऊ नका. कायद्याच्या चौकटीत राहून बोला. व वागा. कुणालाही कमी लेखू नका. धंद्यात फायदा दिसेल परंतु व्यवहाराची घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अहंकारयुक्त भाष्य करू नका.
चांगला दिवस 3, 4
मीन – कामे जिद्दीने पूर्ण करा
चंद्र, बुध त्रिकोणयोग, मंगळ, शनि प्रतियुती. नात्यात, मैत्रीत वाद होतील. किरकोळ कारणाने नाराजी होईल. अनाठायी खर्च टाळा. महत्त्वाची कामे जिद्दीने पूर्ण करा. रागावर ताबा ठेवा. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. नोकरीत वर्चस्व वाढेल. धंद्यात चूक टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठ चर्चा करतील.
चांगला दिवस 7, 8
Comments are closed.