साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 24 ऑगस्ट 2025 ते शनिवार 30 ऑगस्ट 2025

>> नीलिमा प्राचार्य

जाळीदार कामात प्रगती होईल

मेषेच्या पंचमेषात बुध, सूर्य चंद्र लाभयोग. गुप्त कारवायांचा मनस्ताप होईल. त्यामुळे रागाच्या भरात चुकीचे वक्तव्य करू नका. नोकरीमध्ये वरिष्ठांचा वरदहस्त राहील. जवळचे सहकारी मात्र जळफळतील. धंद्यात सहनशीलता ठेवा. फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दगदग होईल. लोकांच्या मनातील दुरावा दूर करा.

चांगला दिवस 24, 28

वृषभ – वरिष्ठांचे मादक महत्त्वाचे

वृषभेच्या सुखस्थानात बुध, शुक्र नेच्यून त्रिकोणयोग. क्षेत्र कोणतेही असो तडजोडीची भूमिका ठेवल्यास अनेक कामे पूर्ण होतील. नोकरीत वरिष्ठांचे मत महत्त्वाचे असेल. मित्र मदत करतील. धंद्यात नम्रता ठेवा. हिशेब तपासा. व्यसनाने मनस्ताप होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मुद्देसूद भाष्य करा. वरिष्ठांना कमी लेखू नका.

चांगला दिवस 25, 26

मिथुन – रागावर ताबा ठेवा

मिथुनेच्या पराक्रमात बुध, चंद्र शुक्र प्रतियुती. श्रीगणेशाचे पूजन मनोभावे करा. कोणतेही काम करताना सावध रहा. वाहन जपून चालवा. रागावर ताबा ठेवा. समस्या वाढणार नाहीत. नोकरीधंद्यात वर्चस्व लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांना गतिमान करा. लोकांच्या समस्येवर उपाय शोधून तुमचे महत्त्व वाढवा. स्पर्धेत पुढे जाल.

चांगला दिवस 24, 25

कर्करोग हिशेब तपासा

कर्केच्या धनेषात बुध, चंद्र मंगळ युती. तुमचा उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अनेक कठीण कामे श्रीगणेशाच्या कृपेने मार्गी लावता येतील. सामाजिक कार्यात सहभाग घ्या. हिशेब तपासा. स्पष्टता ठेवा. नोकरीत वरिष्ठांना खूष कराल. धंद्यात वाढ होईल. नम्रता ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा, सन्मान वाढेल. तुमचे मुद्दे पटवून देता येतील.

चांगला दिवस 26, 27

सिंह – अनाठायी खर्च टाळा

स्वराशीत बुध, चंद्र गुरू त्रिकोणयोग. डोळ्यांची काळजी घ्या. अनाठायी खर्च टाळा. श्रीगणेशाच्या आगमनाची योग्य प्रकारे तयारी करता येईल. पूजा मनोभावे करा. नोकरीत वरिष्ठांच्या मनात चुकीची माहिती भरवली गेल्यास सावध रहा. धंद्यात मोह नको. हिशेब तपासा. राजकी, सामाजिक क्षेत्रात मान, प्रतिष्ठा राहील.

चांगला दिवस 27, 28

कन्या प्रत्येक दिवस यशाचा

कन्येच्या व्ययेषात बुध, शुक्र प्लुटो प्रतियुती. क्षेत्र कोणतेही असो तुमच्या परीक्षेचा कालावधी वाढेल. प्रत्येक दिवस यश देईल. नम्रता ठेवा. प्रतिष्ठेचा प्रयत्न कुठेही निर्माण करू नका. विचलीत होऊ नका. श्री गणेशाच्या पूजनाकडे लक्ष द्या. नोकरी टिकवा. राग वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय, करार करण्यचा उतावळेपणा नको.

चांगला दिवस 27, 28

तूळ – उतावळेपणा नको

तुळेच्या एकादशात बुध, सूर्य चंद्र लाभयोग. घाई, उतावळेपणा नको. दुखापत टाळा. श्रीगणेशाच्या पूजनाच्या तयारीत लक्ष घाला. क्षुल्लक काम राहू शकते. सहजता ठेवा. यश मिळेल. श्रीगणेशाच्या कृपेने समस्या मार्गी लागतील. नोकरीत वरिष्ठांना खूष कराल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या विचारांचे कौतुक होईल.

चांगला दिवस 28, 29

वृश्चिक – विचलित झाले होऊ नका

वृश्चिकेच्या दशमेषात बुध, सूर्य चंद्र लाभयोग. श्री गणेशपूजन आस्थेने कराल. विचलित होऊ नका. तयारी आधीपासून करा. विचारांचा गुंता वाढवू नका. नोकरीत महत्त्व टिकवता येईल. धंद्यात गुंतवणुकीची घाई नको. वसुली करा. चर्चा करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सप्ताहाच्या शेवटी क्षुल्लक चिंता वाटेल. यश खेचून आणाल.

चांगला दिवस 26, 27

धनु – निश्चित धोरण ठेवा

धनुच्या भाग्येषात बुध, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. गोड बोलण्याला न भुलता भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. अनेक कामे करून घेता येतील. मैत्रीत नात्यात गैरसमज होईल. खाण्याची काळजी घ्या. नोकरीत प्रभाव वाढेल. सहकारी नाक मुरडतील. धंद्यात निश्चित धोरण ठेवा. मोह नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अहंकार नको.

चांगला दिवस 28, 29

मकर शब्द जपून वापरा

मकरेच्या अष्टमेषात बुध, चंद्र शुक्र लाभयोग. नैराश्याच्या अधिन होऊ नका. अहंकार, प्रतिष्ठा यांचा जास्त बाऊ न करता कामे करा. चुकीचा शब्द त्रासदायक ठरेल. अनेकांची मने दुखावली जातील. प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. नोकरी टिकवा. धंद्यात कायदा मोडू नका. वसुलीचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अट्टाहास नको.

चांगला दिवस 25, 26

कुंभ – दुखापत टाळा

कुंभेच्या सप्तमेषात बुध, सूर्य चंद्र लाभयोग. मनाप्रमाणे घटना घडतील.  गुप्त कारवायामुळे अडचणी येतील. जवळच्या व्यक्ती कावेबाज वाढतील. खाण्याची काळजी घ्या. दुखापत टाळा. नोकरीत शब्द जपून वापरा. राग वाढेल. धंद्यात नम्रता ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात परस्पर विरोधी घटनांचा अनुभव येईल.

चांगला दिवस 29, 30

मीन –सलोखा राखा

मीनेच्या षष्ठेशात बुध, शुक्र नेपच्यून त्रिकोणयोग. कायदा, सुव्यवस्थेचे भान ठेवा. अभिमानाचा टेंभा मिरवण्यापेक्षा सलोखा राखा. सामाजिक कार्यात वाद वाढवू नका. कायदा पाळा. श्रीगणेश पूजन व्यवस्थित होईल. संयम ठेवा. नोकरीधंदा टिकवण्याचा प्रयत्न करा. लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जास्त अपेक्षा न ठेवता काम करा.

चांगला दिवस 25, 26

Comments are closed.