साप्ताहिक राशिभविष्य- रविवार 22 मार्च 2026 ते शनिवार 28 मार्च 2026
>> नीलिमा प्रधान
मेष – कायदा मोडू नका
स्वराशीत शुक्र, चंद्र मंगळ लाभयोग. प्रत्येक दिवस महत्त्वाचा. उत्साहाच्या भरात कायदा मोडू नका. चुकीचे भाष्य करू नका. नोकरीत वरिष्ठांना मदत करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात टिका करताना तारतम्य ठेवा. सतर्क रहा.
शुभ दिवस. २४, २५
वृषभ – कठीण कामे पूर्ण करा
वृषभेच्या व्ययेषात शुक्र, सूर्य नेपच्यून युती. क्षेत्र कोणतेही असो महत्त्वाची कामे करून घ्या. व्यसन, मोह यामुळे नुकसान होईल. नोकरीधंद्यात जम बसेल. कठीण कामे पूर्ण करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मुद्दे प्रभावी ठरतील. गोड बोला. शुभ दिवस. २६, २७
मिथुन- कार्याला वेग मिळेल
मिथुनेच्या एकादशात शुक्र, सूर्य नेपच्यून युती. चांगल्या कार्याला वेग प्राप्त होईल. उत्साह वाढेल. प्रेरणादायक व्यक्तीचा परिचय होईल. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. धंद्यात जम बसवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल.
शुभ दिवस. २६, २७
कर्क – नोकरीत दगदग होईल
कर्केच्या दशमेषात शुक्र, सूर्य शनि युती. कोणतेही काम करताना योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. फसगत टाळा. नोकरीत दगदग होईल. धंद्यात अविश्वास वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. पद लाभेल. योजना पूर्ण करा.
शुभ दिवस. २६, २७
सिंह – प्रकृतीची काळजी घ्या
सिंहेच्या भाग्येषात शुक्र, चंद्र बुध त्रिकोणयोग. सप्ताहाच्या सुरूवातीपासून कामे पूर्ण करा. प्रकृतीची काळजी घ्या. अहंकार नको. नोकरीत संयम ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कायद्याला धरून वागा. अनधिकृत कामे करू नका.
शुभ दिवस. 24, 26
कन्या- प्रसंगावधान ठेवा
कन्येच्या अष्टमेषात शुक्र, सूर्य नेपच्यून युती. थट्टामस्करी करताना प्रसंगावधान ठेवा. कठोर भाष्य टाळा. नोकरीत जबाबदारी वाढेल. धंद्यात अचानक खर्च होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा जपता येईल.
शुभ दिवस. 24, 26
तूळ- यश संपादन कराल
तुळेच्या सप्तमेषात शुक्र, चंद्र बुध त्रिकोणयोग. प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण केल्यास अडचणी वाढतील. संयम, चातुर्य यावर यश संपादन कराल. नोकरीत वरिष्ठांना मदत करावी लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप होतील.
शुभ दिवस. २५, २६
वृश्चिक- अनाठायी खर्च टाळा
वृश्चिकेच्या षष्ठेशात शुक्र, सूर्य नेपच्यून युती. मनावर दडपण येईल. अनाठायी खर्च टाळा. नविन परिचयावर विश्वास ठेऊ नका. नोकरीत महत्त्वाचे काम कराल. धंद्यात मोठा करार करणे धाडसाचे. राजकीय क्षेत्रात तणाव वाढवू नका.
शुभ दिवस. २४, २८
धनु – कुणालाही कमी लेखू नका
धनुच्या पंचमेषात शुक्र, चंद्र मंगळ त्रिकोणयोग. दुसऱया व्यक्तीच्या सांगण्यावरून मत तयार करू नका. कुणालाही कमी लेखू नका. कायद्याच्या चौकटीत कामे करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा, लोकप्रियता सांभाळा.
शुभ दिवस. २५, २६
मकर – कायदा मोडू नका
मकरेच्या सुखेषात शुक्र, सूर्य चंद्र लाभयोग. क्षुल्लक तणावाकडे जास्त लक्ष देऊ नका. कायदा मोडू नका. नोकरीत प्रभाव वाढेल. धंद्यात लाभ होईल. नविन परिचय चालना देणारा ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मन रमेल.
शुभ दिवस. 23, 28
कुंभ – कामाचा व्याप राहील
कुंभेच्या पराक्रमात शुक्र, सूर्य शनि युती. रागावर ताबा ठेवा. कठोर भाष्य तणाव निर्माण करेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे मुद्दे मांडता येतील. नोकरीत कामाचा व्याप राहील. खरेदी विक्रीत सावध भूमिका घ्या.
शुभ दिवस. २५, २६
मीन- प्रवासात सावध रहा
मीनेच्या धनेषात शुक्र, सूर्य शनि युती. आरोग्याची काळजी घ्या. प्रवासात सावध रहा. वाहन जपून चालवा. नोकरीत कठोर भाष्य करू नका. धंद्यात कराराची घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मुद्दे प्रभावी ठरतील.
शुभ दिवस. २४, २८
Comments are closed.