साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 31 मे 2026 ते शनिवार 06 जून 2026

>> नीलिमा प्रधान

मेष – प्रकृतीची काळजी घ्या

कर्क राशीत गुरू राश्यांतर, चंद्र बुध प्रतियुती. प्रकृतीची काळजी घ्या. वादाला महत्त्व देऊ नका. नोकरीत वरिष्ठांचा दबदबा राहील. धंद्यात वाढ होईल. नविन ओळख फायदेशीर ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मुद्दे प्रभावी ठरतील. शुभ दिवस. 2, 3

वृषभ – वाद वाढवू नका

कर्क राशीत गुरू राश्यांतर, चंद्र, शुक्र प्रतियुती. कोणताही वाद वाढवू नका. प्रवासात सावध रहा. कठीण कामे करून घ्या. व्यावहारिक दृष्टीकोन वाढेल. नोकरीत क्षुल्लक अडचण येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योग्य कामे होतील. शुभ दिवस. ३१, १

मिथुन – नोकरीत व्याप वाढेल

कर्केत गुरू राश्यांतर, चंद्र, शुक्र प्रतियुती. प्रतिष् ठेचा  प्रश्न निर्माण करू नका. तणाव, अडचणी वाढतील. वाकडय़ा वाटेने यश मिळवण्याचा प्रयत्न करू नका. नोकरीत व्याप वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ भूमिका घ्या. शुभ दिवस. 2, 3

कर्क – सौम्य धोरण ठेवा

स्वराशीत गुरू राश्यांतर, सूर्य चंद्र त्रिकोण योग. उतावळेपणाने भावनांचा उद्रेक होईल. कुणाच्याही आहारी जाऊ नका. सौम्य धोरण ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कारवाया वाढतील. नोकरीत प्रभाव दिसेल. आर्थिक व्यवहार जपून करा. शुभ दिवस. ४, ५

सिंह – कठीण प्रश्न सोडवा

कर्केत गुरू राश्यांतर, चंद्र, बुध प्रतियुती. चातुर्याने कोणतेही कठीण प्रश्न सोडवा. प्रवासात सावध रहा. नोकरीत अडचणी वाढतील. दगदग होईल. विरोधक मैत्री करतील. अरेरावी नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोहाला बळी पडू नका. शुभ दिवस. 2, 3

कन्या – मनाप्रमाणे घटना घडतील

कर्केत गुरू राश्यांतर, चंद्र त्रिकोण योग. तुमच्या क्षेत्रात जाल. मनाप्रमाणे घटना घडतील. नविन परिचय फायदेशीर. नोकरी-धंद्यातील जुना वाद, तणव मिटवता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेकांचे सहकार्य मिळेल. शुभ दिवस. ३१, ५

तूळ – कायदेशीर व्यवहार करा

कर्केत गुरू राश्यांतर, चंद्र बुध त्रिकोण योग,. प्रत्येक दिवस महत्त्वपूर्ण ठरेल. रेंगाळलेल्या कामांना गती मिळेल. प्रलोभनाला बळी पडू नका. नोकरीच्या कामात सावध रहा. कायदेशीर व्यवहार करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. शुभ दिवस. 3, 4

वृश्चिक – रेंगाळलेली कामे होतील

कर्केत गुरू राश्यांतर, सूर्य चंद्र त्रिकोण योग. प्रत्येक दिवस महत्त्वपूर्ण ठरेल. रेंगाळलेल्या कामांना गती मिळेल. नविन परिचयाला भाळू नका. नोकरीत सावध रहा. कायदेशीर व्यवहार करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. शुभ दिवस. 3, 4

धनु – प्रकृतीची काळजी घ्या

कर्केत गुरू राश्यांतर, सूर्य, चंद्र षडाष्टक योग. क्षुल्लक चूक मोठी ठरू शकते. सतर्क रहा.  नोकरी टिकवा. धंद्यात आळस नको. प्रकृतीची काळजी घ्या. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तणाव वाढेल. संयम ठेवा. शुभ दिवस. ४, ५

मकर –  गैरसमज दूर ठेवा

कर्केत गुरू राश्यांतर, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. मनाप्रमाणे काम करण्याची संधी मिळेल. दिशादर्शक कालावधी. नोकरीत वाद होतील. मैत्रीत, नात्यात गैरसमज नको. मौल्यवान वस्तू सांभाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कारवाया होतील. शुभ दिवस. ५, ६

कुंभ – अहंकार दूर ठेवा

कर्केत गुरू राश्यांतर, बुध प्लुटो षडाष्टक योग.  नम्र रहा. शेजारी निष्कारण समस्या निर्माण करतील. बुद्धिचा वापर करा. नोकरी टिकवा. धंद्यात आळस नको. अहंकार दूर ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात निरीक्षण करून अभ्यासपूर्ण बोला. शुभ दिवस. ३१, १

मीन – आक्रमक होऊ नका

कर्केत गुरू राश्यांतर, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. क्षुल्ल्क विरोधावर आक्रमक होऊ नका. दिग्गज व्यक्तींचा परिचय होईल. खरेदी-विक्रीत घाई नको. नोकरी, धंद्यात समतोल राखा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चांगले वातावरण राहील. शुभ दिवस. ५, ६

Comments are closed.