साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 01 नोव्हेंबर 2026 ते शनिवार 07 नोव्हेंबर 2026
>> नीलिमा प्रधान
संमिश्र घटना घडतील
मेष – कन्येत शुक्र वक्री. तुमच्या क्षेत्रात संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. परिचयात वाढ होईल. आत्मविश्वास वाढविणाऱया घटना घडतील. कोणतीही चर्चा वादाकडे नेऊ नका. रागावर ताबा ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधकांना कमी लेखू नका. शुभ दि. 3, 4
वादविवाद टाळा
वृषभ – कन्या राशीत शुक्र वक्री. दिपावलीच्या सणात वादविवाद टाळा. कायदा पाळा. नोकरीच्या कामात सावध रहा. वरिष्ठांना कमी लेखू नका. धंद्यात अरेरावी नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मुद्दा योग्यरित्या मांडा. मर्यादा पाळा. शुभ दि. 1, 2
महत्त्वपूर्ण कामे करा
मिथुन – कन्या राशीत शुक्र वक्री. प्रत्येक दिवस यश, आत्मविश्वास देणारा असेल. महत्त्वाची कामे पूर्ण करा. कठीण समस्या रेंगाळत ठेऊ नका. नोकरी धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. प्रशंसा होईल. शुभ दि. 1, 2
वाहन हळू चालवा
कर्क – शुक्र वक्री होत आहे. क्षुल्लक वादाला महत्त्व न देता महत्त्वाची कामे करा. वाहन हळू चालवा. कायदा मोडू नका. दुखापत टाळा. नोकरीधंद्यात चांगली घटना घडेल. नवे काम मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नम्रता ठेवा. शुभ दि. 3, 4
जुना वाद मिटवा
सिंह – शुक्र वक्री होत आहे. तुमच्या कार्याला, विचारांना चालना देणारा सप्ताह ठरेल. राग वाढू देऊ नका. प्रवासात सावध रहा. नोकरीधंद्यातील समस्या सोडवता येतील. जुना वाद मिटवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. शुभ दि. 5, 6
संयमी भूमिका घ्या
कन्या – शुक्र कन्येत वक्री. वाहन हळू चालवा. प्रकृतीची काळजी घ्या. किरकोळ वादाला मोठे स्वरूप देऊ नका. संयमी भूमिका घ्या. अनाठायी खर्च टाळा. नोकरीत अडचण येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अहंकाराची भावना ठेऊ नका. शुभ दि. 1, 2
अनाठायी खर्च नको
तूळ – शुक्र वक्री कन्येत. दिपावलीची तयारी करताना दुखापत टाळा. अनाठायी खर्च नको. कुणालाही दुखवू नका. मनावर दडपण येईल. नोकरीधंद्यात सुधारणा होईल. महत्त्वाच्या वस्तू जपा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. शुभ दि. 1, 2
वेळेला महत्त्व द्या
वृश्चिक – शुक्र वक्री कन्येत. वेळेला महत्त्व देऊन कामांचे नियोजन करा. अहंकारयुक्त भाषा उपयुक्त ठरणार नाही. दिपावलीची तयारी, खरेदी करताना सौम्य धोरण ठेवा. खर्चावर बंधन ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कायदा पाळा. शुभ दि. 1, 2
प्रकृतीची काळजी घ्या
धनु – शुक्र वक्री कन्येत. प्रकृतीची काळजी घ्या. दुखापत, वाद टाळा. दिपावलीच्या सणाची तयार करताना घाई गडबड करू नका. नोकरीधंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सौम्य धोरण ठेवा. तुमच्यावर निष्कारण आरोप होतील. शुभ दि. 3, 4
संयम बाळगा
मकर – शुक्र वक्री कन्येत. योग्य असलेला मुद्दा पटवून देताना चातुर्य, सौम्य भाषा वापरावी लागेल. राग वाढवू नका. कायदा सर्वत्र पाळा. नोकरीत तत्परता राखा. संयम ठेवा. धंद्यात अरेरावी नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चौफेर दबाव राहील. शुभ दि. 1, 2
मानसिक दडपण वाढेल
कुंभ – शुक्र वक्री. शारीरिक, मानसिक दडपण वाढेल. प्रकृतीची योग्य काळजी घ्या. दिपावलीची तयारी करताना अडचणी, तणाव येईल. खर्च वाढेल. कामात चूक टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्पर्धा करणारे वाढतील. प्रतिष्ठा राहील. शुभ दि. 3, 4
कायदा मोडू नका
मीन – शुक्र वक्री. कोणताही निर्णय घेताना, काम करताना संयम, सहनशीलता ठेवा. अनुभवाचा उपयोग करा. कोणतीही चूक महागात पडेल. कायदा मोडू नका. अनधिकृत कृती करू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ धोरण ठेवा. शुभ दि. 1, 2
Comments are closed.