साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 14 जून 2026 ते शनिवार 20 जून 2026
>> नीलिमा प्रधान
मेष – नोकरीत चातुर्याने वागा
रवि, मंगळ राश्यांतर, चंद्र बुध युती. अडचणींतून चातुर्याने मार्ग शोधा. साडेसाती सुरू आहे. अहंकार दूर ठेऊन वागा. नोकरीत सुलभता येईल. धंद्यात चातुर्याने वागा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होईल. शुभ दिवस. 16, 20
वृषभ – प्रगतीची संधी लाभेल
रवि, मंगळ राश्यांतर, चंद्र, शुक्र युती. प्रत्येक दिवस यश, उत्साह वाढविणारा. महत्त्वाची कठीण कामे करा. तुमच्या क्षेत्रात प्रगतीची संधी लाभेल. नोकरीत प्रभाव वाढेल. स्पर्धेत ध्येय गाठा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता लाभेल. शुभ दिवस. १६, १७
मिथुन – रेंगाळलेली कामे करा
रवि, मंगळ राश्यांतर, चंद्र, शुक्र युती. रेंगाळलेली कामे करा. कोर्टकेस संपवा. नोकरीत महत्त्वाचे काम केल्याने स्तुती होईल. चौफेर यश लाभेल. धंद्यात जम बसवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात डावपेच यशस्वी होतील. प्रतिष्ठा लाभेल. शुभ दिवस. १७, १८
कर्क – जबाबदारी पूर्ण करा
रवि, मंगळ राश्यांतर, शुक्र नेपच्यून त्रिकोणयोग. कायद्याच्या चौकटीत राहून कामे करा. नोकरीत योग्य जबाबदारी पूर्ण करा. हिशेबात चुकू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठेचा वापर करा. हुशारीने समस्या सोडवा. शुभ दिवस. 19, 20
सिंह – अनुभव मार्ग दाखवतील
रवि, मंगळ राश्यांतर, चंद्र, बुध युती. जुने अनुभव मार्ग दाखवतील. तुमच्या क्षेत्रातील प्रश्न सोडवा. मोठेपणाची भावना घातक ठरेल. प्रकृतीची योग्य काळजी घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योग्य गुरूचे मत विचारात घ्या. शुभ दिवस. 16, 20
कन्या – नोकरीत प्रशंसा होईल
रवि, मंगळ राश्यांतर, चंद्र, गुरू युती. सप्ताहाच्या सुरूवातीपासून महत्त्वाची कामे करण्यास सुरूवात करा. तुमच्या क्षेत्रात स्थान मजबूत होईल. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चर्चेत यश मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. शुभ दिवस. १६, १७
तूळ – अधिकार प्राप्ती होईल
रवि, मंगळ राश्यांतर, चंद्र, बुध युती. प्रेमाने व युक्तीने वागा. कठीण कामे वेळेत पूर्ण करा. दुखापत टाळा. रागावर ताबा ठेवा. नोकरीत वरिष्ठांना खूष कराल. कोर्टकेस संबंधी कामे करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार लाभतील. शुभ दिवस. १६, १७
वृश्चिक – करार करताना काळजी घ्या
रवि, मंगळ राश्यांतर, शुक्र नेपच्यून त्रिकोणयोग. दूरदृष्टिकोन ठेवा. अहंकाराची भाषा टाळा. कायदा मोडेल असे कृत्य नको. कोणताही करार करताना चौकस रहा. नोकरीत तत्परता ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा जपा. शुभ दिवस. १८, १९
धनु – विरोधकांना जपा
रवि, मंगळ राश्यांतर, सूर्य, चंद्र लाभयोग. गुपित उघड करू नका. भावनेच्या आहारी जाऊ नका. पोटाची काळजी घ्या. नोकरीत स्पर्धा वाढेल. विरोधकांना कमी लेखू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रलोभनाला बळी पडू नका. शुभ दिवस. 16, 20
मकर – अहंकार दूर ठेवा
रवि, मंगळ राश्यांतर, चंद्र, शुक्र युती. विचारांना चालना देणारी घटना घडेल. आत्मविश्वास वाढेल. गाफिल राहू नका. क्षुल्लक अपमानाकडे दुर्लक्ष करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्पष्ट बोलणे टाळा. अहंकारयुक्त भाषा नको. शुभ दि. 17, 18
कुंभ – राजकीय मुद्दे प्रभावी ठरतील
रवि, मंगळ राश्यांतर, सूर्य, चंद्र लाभयोग. गुप्त कारवाया वाढतील. शेजारी निष्कारण त्रास देतील. नोकरी टिकवा. धंद्यात हुशारी वापरा. नातेसंबंध, मैत्रीत नाराजी होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. शुभ दिवस. 16, 19
मीन – संधीचा वापर करा
रवि, मंगळ राश्यांतर, चंद्र, शुक्र युती. महत्त्वाची कामे करण्याचा प्रयत्न करा. अतिशयोक्ती न करता कामे करा. संधीचा वापर करा. नोकरीत सुसंवाद ठेवा. नविन परिचय फायदेशीर ठरतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. शुभ दिवस. १७, १८
Comments are closed.