साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 22 डिसेंबर ते शनिवार 28 डिसेंबर 2024

>> नीलिमा प्रधान

जाळी – प्रवासात सावध रहा

मेषेच्या एकादशात शुक्र, सूर्य चंद्र लाभयोग. या आठवडय़ात अडचणी येतील. शाब्दिक चकमक होईल. प्रवासात सावध रहा. दुखापत टाळा. नोकरीत दगदग होईल. धंद्यात कष्ट घ्यावे लागतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चर्चेतून तणाव निर्माण होईल. नम्रता, सौजन्य ठेवल्यास अधिक प्रभाव वाढेल. कौटुंबिक नाराजी वाढेल.

शुभ दिवस. २५, २६

वृषभ – संयम बाळगा

वृषभेच्या दशमेषात शुक्र, बुध गुरू प्रतियुती. अतिशयोक्तीपूर्ण आत्मविश्वास दाखवू नका. नवीन परिचय उत्साह वाढवणारा ठरेल. नोकरीत बुद्धिचे कौतुक होईल. वरिष्ठांना शह देण्याचा प्रयत्न नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवायांवर नजर ठेवा. संयम ठेवा. तुमचे मुद्दे योग्य असतील परंतु वरिष्ठांपर्यंत पोहोचण्यास विलंब होऊ शकतो.

शुभ दिवस. 22, 23

मिथुन – कार्यावर लक्ष द्या

मिथुनेच्या भाग्येषात शुक्र, सूर्य चंद्र लाभयोग. थट्टा मस्करी करताना वाहवत जाऊ नका. प्रसंग पाहून वक्तव्य करा. नवीन ओळख मनस्ताप देणारी ठरेल. नोकरीतील समस्या सोडवाल. धंद्यात नुकसान, खर्च होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यावर लक्ष द्या. जनतेला कमी लेखू नका. वरिष्ठांच्या समवेत चर्चा करताना वातावरणाचा अंदाज घ्या.

शुभ दिवस. २५, २६

कर्करोग – नोकरीत तडजोड स्वीकारा

कर्केच्या अष्टमेषात शुक्र, बुध गुरू प्रतियुती. बुद्धिचातुर्य वापरूनच कामे करून घ्या. अहंकाराने तणाव, चिंता वाढेल. नोकरीत तडजोड स्वीकारा. कामात प्रभाव राहील. धंद्यात गोड बोला. फायदा वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात थंड डोक्याने समस्या सोडवण्याचा प्रयत्न केल्यास नुकसान टळेल. कायदा पाळा.

शुभ दिवस. 22, 23

सिंह – व्यवहारात सावध रहा

सिंहेच्या सप्तमेषात शुक्र, सूर्य चंद्र लाभयोग. कोणत्याही व्यक्तीस गृहित धरू नका म्हणजे भ्रमनिरास होणार नाही. नोकरीत इतरांना मदत करावी लागेल. वर्चस्व राहील. धंद्यात सावधपणे व्यवहार करा. नुकसान टळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाच्या कामाची जबाबदारी घ्यावी लागेल. कुणालाही कमी लेखू नका.

शुभ दिवस. 23, 25

कन्या – प्रत्येक दिवस यशस्वी

कन्येच्या षष्ठेशात शुक्र, बुध गुरू प्रतियुती. प्रत्येक दिवस यशस्वी करण्याचा प्रयत्न करा. सौजन्य ठेवा म्हणजे तणाव होणार नाही. नोकरीत कर्तृत्व दाखवाल. कौतुकास्पद काम कराल. धंद्यात वाढ, लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांसह चांगला व्यवहार ठेवा. कठोर बोलणे नको. तुमच्या कार्यावर अधिक लक्ष ठेवा.

शुभ दिवस. २५, २६

तूळ – उतावळेपणा नको

तुळेच्या पंचमेषात शुक्र, सूर्य चंद्र लाभयोग. सप्ताहाच्या सुरूवातीला संघर्ष टाळा. निर्णय घेताना उतावळेपणा नको. नोकरीत प्रगतीकारक स्थिती राहील. धंद्यात वाढ होईल. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठ तुमचे मुद्दे ऐकून घेतील. तत्परता ठेवा. भाळून न जाता स्थिर रहा.

शुभ दिवस. २६, २८

वृश्चिक – वरिष्ठांची मर्जी राहील

वृश्चिकेच्या सुखस्थानात शुक्र, बुध गुरू प्रतियुती. अनेक कामांना गती मिळेल. संसारात सुखद समाचार मिळेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधकांना गप्प कराल. योजना, समाजकार्य यात प्रगतीकारक कर्तृत्व दाखवाल. मदत, सहकार्य मिळेल. खरेदी-विक्रीत लाभ होईल.

शुभ दिवस. 22, 23

धनु – क्षुल्लक तणाव राहील

धनुच्या पराक्रमात शुक्र, सूर्य मंगळ षडाष्टक योग. सप्ताहाच्या शेवटी चुकीचे, वादग्रस्त वक्तव्य होईल. दुखापत टाळा. नोकरीत क्षुल्लक तणाव राहील. धंद्यात वाद वाढवू नका. गोड बोला. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याची, बुद्धिमत्तेची, सहनशीलतेची परीक्षा पाहिली जाईल पण प्रतिष्ठा वाचवता येईल.

शुभ दिवस. 22, 23

मकर – विचारपूर्वक बोला

मकरेच्या धनेषात शुक्र, बुध गुरू प्रतियुती. क्षेत्र कोणतेही असो कोणताही निर्णय निश्चित करण्याची घाई करू नये. चर्चा, संभाषण यातूनच पुढे जावे. नोकरी टिकवावी. धंद्यात अरेरावी, उद्धटपणा नको. लाभ होईल. कायदा पाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात  दबाव वाढेल. संयम ठेवा. विचारपूर्वक बोला. पुढील चांगल्या संधीची वाट पहा.

शुभ दिवस. २४, २५


कुंभ – विरोधकांचे डावपेच जाणा

स्वराशीत शुक्र, सूर्य चंद्र लाभयोग. आरोग्याची काळजी घ्या. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. गुप्त कारवायांवर नजर ठेवा. मैत्रीत, नात्यात क्षुल्लक नाराजी होईल. धंद्यात हिशेब तपासा. मोह धरू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील विरोधकांचे डावपेच ओळखता येतील. ज्ञानात भर पडेल. चर्चा यशस्वी होईल.

शुभ दिवस. २५, २८

मीन – प्रतिष्ठा लाभेल

मीनेच्या व्ययेषात शुक्र, बुध गुरू प्रतियुती. खरेदीविक्रीचा व्यवहार सप्ताहाच्या पूर्वार्धात करण्याचा प्रयत्न करा. नवीन ओळखीवर विश्वास ठेऊ नका. नोकरीत बुद्धिमत्ता उपयोगी पडेल. वरिष्ठांना खूष कराल. धंद्यात वाढ होईल. वसुली कराल. भागीदार क्षुल्लक कारणाने संताप देईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा, मान मिळेल.

शुभ दिवस. २४, २७

Comments are closed.