साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 9 फेब्रुवारी ते शनिवार 15 फेब्रुवारी 2025

>> नीलिमा प्राचार्य

मेष – प्रत्येक दिवस उत्साहाचा

मेषेच्या एकादशात बुध, सूर्य, सूर्य-बुध युती. कर्तव्य करा. भावनेच्या आहारी जाऊ नका. प्रत्येक दिवस उत्साहवर्धक ठरेल. नोकरीमध्ये वरिष्ठांची कामे केल्याने आदर निर्माण होईल. धंद्यात मोह नको. हिशेब नीट करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. दूरदृष्टिकोन कौतुकास्पद ठरेल. तुमच्या क्षेत्रात पुढे राहाल. चांगला दिवस 9, 13

वृषभ – कामांना गती मिळेल

वृषभेच्या दशमेषात बुध, सूर्य, चंद्र शुक्र त्रिकोणयोग. अनेक कामांना गती मिळेल. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. तुमच्या क्षेत्रात आघाडीवर राहाल. नोकरीत प्रगती होईल. धंद्यात सुधारणा होईल. मेहनत घ्या. पुढे जाल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चालना देणाऱया घटना घडतील. वाद, गैरसमज दूर सारून नवा मार्ग घेता येईल. चांगला दिवस 9, 10

मिथुन – दडपण कमी होईल

मिथुनेच्या भाग्येषात बुध, रवि, चंद्र शुक्र त्रिकोणयोग. समस्या कमी करता येतील. वेगाने कामे पूर्ण कराल. आळस नको. प्रकृतीत सुधारणा होईल. नोकरीमध्ये दिलासा मिळेल. धंद्यात वाढ, लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गैरसमज, तणाव दूर झाल्याने मनावरील दडपण कमी होईल. रेंगाळलेली कामे होतील. चांगला दिवस 13, 14

कर्क – उतावळेपणा नको

कर्केच्या अष्टमेषात बुध, रवि, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. क्षुल्लक तणाव, संताप यामुळे अस्वस्थ व्हाल. संयमाने प्रकरण हाताळा. कायदा पाळा. नोकरीत शब्द जपून वापरा. धंद्यात उतावळेपणा नको. वस्तू सांभाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गैरसमज होईल. वरिष्ठांची मर्जी राखा. प्रसंगावधान ठेवा. व्यवहारात सावध रहा. चांगला दिवस 10, 11

सिंह – तटस्थ भूमिका घ्या

सिंहेच्या सप्तमेषाबाबत बुध, रवि राश्यांतर. चंद्र, गुरू लाभयोग. सप्ताहाच्या उत्तरार्धात दिलासा देणारी घटना घडेल. नोकरीत भावनेच्या आहारी जाऊ नका. कामात चूक टाळा. धंद्यात विषय समजून घ्या. गुंतवणुकीची घाई नको. नातेसंबंध, मैत्रीमध्ये गैरसमज नको. प्रकृतीची काळजी घ्या. तटस्थ भूमिका घ्या. चांगला दिवस 14, 15

कन्या – वाद वाढवू नका

कन्येच्या षष्ठेशात बुध, रवि राश्यांतर. चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ देऊ नका. कायदा पाळा. व्यवहारात घाई नको. फसगत टाळा. खोटय़ा प्रतिष्ठेच्या आहारी जाऊ नका. नोकरीत काम वाढेल. धंद्यात वाद वाढवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांना पुढे नेण्यात अडचणी येतील. चांगला दिवस 9, 10

तूळ – अनाठायी खर्च टाळा

तूळेच्या पंचमेषात बुध, सूर्य, चंद्र बुध प्रतियुती. आळस न करता योग्य कामांची रूपरेषा तयार करा. म्हणजे अनेक कामे पूर्ण करता येतील. नोकरीत आनंदाची बातमी मिळेल. व्यवसायाला गती मिळेल. वसुली करा. अनाठायी खर्च टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिलासा देणारी घटना घडेल. वरिष्ठ तुमचे मुद्दे विचारात घेतील. चांगला दिवस 13, 14

वृश्चिक – मुद्दे वादग्रस्त ठरतील

वृश्चिकेच्या सुखस्थानात बुध, सूर्य, चंद्र शुक्र त्रिकोणयोग. गोड बोलून तुमच्या हिताची कामे करून घ्या. तणाव वाढू देऊ नका. नोकरीत आळस नको. व्यवसायात उतावळेपणा नको. क्षुल्लक तणाव, समस्या येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे वादग्रस्त ठरू शकतात. तुमचे धोरण संशयास्पद वाटू शकते. यश खेचता येईल. चांगला दिवस 10, 11

धनु – वाटाघाटीत यश मिळेल

धनुच्या पराक्रमात बुध, रवि, सूर्य, बुध युती. सप्ताहाच्या शेवटी चांगली बातमी मिळेल. तणाव कमी होईल. नोकरीच्या ठिकाणी वर्चस्व वाढेल. धंद्यात सुधारणा वेग कमी वाटेल. संयम ठेवा. प्रवासात घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दगदग, धावपळ वाढली तरी प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. वाटाघाटीत यश मिळेल. चांगला दिवस 13, 14

मकर – प्रवासात घाई नको

मकरेच्या धनेषात बुध, सूर्य, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. अनेक कठीण, रेंगाळलेली कामे होण्याची शक्यता दिसेल. उत्साह वाढेल. कला, क्रीडा, साहित्यात प्रगती होईल. नोकरीमध्ये दिलासा मिळेल. धंद्यातील अडचणी कमी करू शकाल. प्रवासात घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता, प्रतिष्ठा वाढेल. योजनांचा आढावा घ्या. चांगला दिवस 10, 11

कुंभ – प्रेरणादायक वातावरण

स्वराशीत बुध, सूर्य. चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. साडेसाती सुरू आहे. मनावरील दडपण कमी होईल. प्रेरणादायक वातावरण असेल. नोकरीत नम्रता, संयम ठेवा. धंद्यात वाढ होईल. वाद टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात निश्चित धोरण ठरवणे सोपे वाटले तरी प्रत्यक्षात काही घटना वादग्रस्त ठरू शकतात. गुप्त कारवायांवर लक्ष ठेवा. चांगला दिवस 13, 14

मीन – धंद्यात सतर्क रहा

मीनेच्या व्ययेषात बुध, सूर्य, चंद्र गुरू लाभयोग. साडेसाती सुरू आहे. कोणालाही कोणतेही आश्वासन देऊ नका. व्यवहारातील फसगत टाळता येईल. संयम, सहनशीलता ठेवा. कायदा सर्वत्र पाळा. नोकरी टिकवा. प्रवासात घाई नको. धंद्यात सतर्क रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या खांद्यावर बंदूक ठेऊन वार करेल. चौफेर सावध रहा. चांगले

Comments are closed.