साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 12 एप्रिल 2026 ते शनिवार 18 एप्रिल 2026

>> नीलिमा प्रधान

मेष – कामे मार्गी लागतील

स्वराशीत सूर्य राश्यांतर, मंगळ नेपच्यून युती. अनेक कामे मार्गी लागतील. संयमाने तुमचे मत मांडा. कुठेही आग्रही भूमिका घेऊ नका. संघर्षापासून दूर रहा.  नोकरीधंद्यात सुधारण होईल्. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिलासा मिळेल.

शुभ दिवस. १३, १४

वृषभ – अनाठायी खर्च टाळा

मेषेत सूर्य राश्यांतर, चंद्र बुध युती. तत्परता व चातुर्य वापरूनच यश मिळवावे लागेल. सहकारी, मित्र, नातलग यांच्यात गैरसमज होतील. अनाठायी खर्च टाळा. नोकरीतील समस्या सोडवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ रहा.

शुभ दिवस. १२, १३

मिथुन – मोठे ध्येय गाठाल

सूर्य राश्यांतर, चंद्र बुध युती. रखडलेली कामे वेगाने मार्गी लागतील. वेळेला महत्त्व द्या. मोठे ध्येय गाठाल. तुमच्या क्षेत्रात प्रगती होईल. नोकरीधंद्यात, खरेदीविक्रीत फायदा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार लाभतील.

शुभ दिवस. 14, 15

कर्क – उतावळेपणा दूर ठेवा

मेषेत सूर्य राश्यांतर, बुध नेपच्युन युती. तात्पुरत्या विषयावर लक्ष देऊन यश मिळवा. मोठी चूक होणार नाही याकडे लक्ष द्या. नोकरीधंद्यात लाभ होतील. उतावळेपणा नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रसंगावधान राखा.

शुभ दिवस. १६, १८

सिंह – चातुर्याने वागा

मेषेत सूर्य राश्यांतर, शुक्र गुरू लाभयोग. संमिश्र स्वरूपाचा काळ राहील. वादाच्या प्रसंगावर मात करा. चातुर्याने वागा तरच वर्चस्व राहील. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत कठोर भाष्य नको. राजकीय, सामजिक क्षेत्रात अहंकार दूर ठेवा.

शुभ दिवस. 14, 18

कन्या – अवाजवी खर्च टाळा

मेषेत सूर्य राश्यांतर, चंद्र, बुध युती. अवाजवी खर्च टाळा. थट्टा करताना वेळेचे भान ठेवा. गैरसमज व अपमान होतील. चातुर्याची भाषा यश देईल.  कायदा पाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता वाढेल. चौफेर सावध रहा.

शुभ दिवस. १२, १६

तूळ – कोणालाही कमी लेखू नका

मेषेत सूर्य राश्यांतर, शुक्र गुरू लाभयोग. भावनेच्या आहारी न जाता व्यवहार करा. फसगत टाळा. नोकरीत वरिष्ठांना खूष करताना इतरांना कमी लेखू नका. धंद्यातील हिशेब तपासा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात समतोल राखा. सावध रहा.

शुभ दिवस. 14, 18

वृश्चिक – महत्त्वाच्या वस्तू सांभाळा

सूर्य राश्यांतर, चंद्र बुध युती. कुठेही आश्वासान देऊ नका. दिलेला शब्द पाळणे कठीण होईल. पोटाची काळजी घ्या. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. नोकरी टिकवा. धंद्यात समतोल राखा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रसंगावधान राखा.

शुभ दिवस. १२, १६

धनु – नोकरीत वर्चस्व राहील

पंचमेशात सूर्य राश्यांतर, शुक्र गुरू लाभयोग. प्रत्येक दिवस यश देणारा. वाद टाळा. चातुर्याने भाष्य करा. नोकरीत वर्चस्व राहील. धंद्यात लाभ होतील. वाहनाचा धोका टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. स्पर्धेत पुढे जाल.

शुभ दिवस. १३, १४

मकर – महत्त्वाच्या वस्तू सांभाळा

चतुर्थेशात सूर्य राश्यांतर, चंद्र बुध युती. चांगल्या कामाचे कौतुक होणे कठीण. वाद, गैरसमज होतील. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दडपण येईल. समतोल राखणे कठीण होईल. गुप्त कारवायांवर नजर ठेवा.

शुभ दिवस. १२, १३

कुंभ – प्रश्न रेंगाळत ठेऊ नका

पराक्रमात सूर्य राश्यांतर, बुध नेपच्यून युती. क्षुल्लक तणावाकडे दुर्लक्ष करा. ध्येयावर लक्ष द्या. दिग्गज व्यक्तीचां परिचय होईल. कोर्ट केस, किचकट प्रश्न रेंगाळत ठेऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील.

शुभ दिवस. १५, १६

मीन – लोकप्रियता वाढेल

धनेषात सूर्य राश्यांतर, बुध हर्षल लाभयोग. सप्ताहाच्या शेवटी दिलासा देणारी घटना घडेल. तुमचे कौतुक होईल. दिग्गज व्यक्तींचा सहवास वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पद, प्रतिष्ठा लोकप्रियता वाढेल.

शुभ दिवस. १६, १८

Comments are closed.