तृणमूल 226 पेक्षा जास्त जागा जिंकणार, ममतांनी फेटाळले एक्झिट पोल
भाजपच्या विजयाचे अंदाज वर्तवणारे सगळे एक्झिट पोल तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी आज फेटाळून लावले. ‘बंगालमध्ये माँ, माटी आणि माणूषचेच सरकार येणार. तृणमूल काँग्रेस 226 पेक्षा जास्त जागा जिंकणार,’ असा जबरदस्त विश्वास ममतांनी व्यक्त केला.
ममतांनी ‘एक्स’वर एक व्हिडीओ पोस्ट केला. ‘भाजपच्या बाजूने दाखवले जाणारे एक्झिट पोल हा व्यापक नरेटिव्हचा भाग आहे. तृणमूलच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा हा प्रयत्न आहे. तृणमूलला रोखता येणार नाही हे भाजपलाही माहीत आहे. मागच्या निवडणुकीपेक्षा आम्ही जास्त जागा जिंकू,’ असेही त्या म्हणाल्या.
कोलकात्यात राडा! टपाली मतांच्या पोट उघडल्याचा तृणमूलचा दोष
ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर मतदारसंघात आज मोठा राडा झाला. येथील एका स्ट्राँगरूममधील मतपेटय़ा उघडल्याचा आरोप तृणमूलच्या नेत्यांनी केला. हे भाजपचे लोक होते आणि निवडणूक आयोगाच्या मदतीने हे सर्व करण्यात आल्याचा दावा तृणमूलने केला. तसेच, या गडबड घोटाळ्याचा व्हिडिओही एक्सवर शेअर केला. या प्रकाराचा निषेध करत तृणमूलचे नेते स्ट्राँगरूमबाहेरच ठिय्या आंदोलनास बसले. गडबड झाल्याचे कळताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतः तिथे पोहोचल्या आणि स्ट्राँगरूमची पाहणी केली. त्यामुळे कोलकात्यात तणाव वाढला आहे.
Comments are closed.