ICC T20 WC 2026 – वेस्ट इंडिजच्या विजयाची हॅट्ट्रिक, नेपाळवर 9 विकेट्सने मात करत सुपर-8 मध्ये प्रवेश
मुंबईतील वानखेडे मैदानावर झालेल्या टी-20 वर्ल्डकप 2026 मधील 25 व्या सामन्यात वेस्ट इंडीज संघाने नेपाळवर 9 विकेट्सने शानदार विजयएल्बा. वेस्ट इंडिजने विजयाची हॅट्ट्रिक साधत सुपर-8 फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे सुपर-8 गाठणारा वेस्ट इंडीज पहिला संघ ठरला आहे.
प्रथम फलंदाजी करत नेपाळने 20 षटकांत 133 धावांचे लक्ष्य उभे केले. कुशल भुर्तेल अवघ्या एका धावेवर बाद झाला, तर आसिफ शेखने 10 चेंडूत 11 धावा केल्या. दीपेंद्रसिंह ऐरीने सर्वाधिक 58 धावा करत झुंज दिली. लोकेश बामने 13, तर सोमपाल कामीने नाबाद 26 धावा जोडल्या. वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डर याने शानदार गोलंदाजी करत 4 बळी घेतले. त्याला अकील होसेन, मॅथ्यू फोर्ड, शमार जोसेफ आणि रोस्टन चेस यांनी प्रत्येकी एक बळी घेऊन साथ दिली.
नेपाळने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना ब्रँडन किंग लवकर बाद झाला. त्याने 22 धावा केल्या. मात्र त्यानंतर शाई होप आणि शिमरॉन हेटमायर यांनी नाबाद भागीदारी करत सामना एकतर्फी केला. शाई होपने 44 चेंडूत नाबाद 61 धावा, तर हेटमायरने 32 चेंडूत नाबाद 46 धावा करत संघाला 15.2 षटकांतच विजय मिळवून दिला. नेपाळकडून नंदन यादवने एकमेव बळी घेतला.
Comments are closed.