इंग्लंड-आयर्लंड वनडे मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघ जाहीर..! दमदार खेळाडूंना मिळाली संधी

2 वेळचा टी20 विश्वचषक विजेता संघ वेस्ट इंडिजने इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. या महिन्याच्या अखेरीस वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंड आणि आयर्लंडचा दौरा करणार आहे. तिथे वनडे मालिका आयोजित केली जाईल आणि त्यासाठी संघाची घोषणा आधीच करण्यात आली आहे. (West Indies squad announced for ODI series)

वेस्ट इंडिज आणि आयर्लंडमध्ये (21 मे ते 25 मे) दरम्यान 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाईल. त्यानंतर (29 मे ते 3 जून) दरम्यान इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका आयोजित केली जाईल. एकूण 6 वनडे सामन्यांचे आयोजन केले जाईल. यादरम्यान विस्फोटक फलंदाज शाई होप संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तर ब्रँडन किंग, एविन लुईस आणि केसी कार्टी सारख्या फलंदाजांनाही संघात स्थान मिळाले आहे. त्याच वेळी, युवा खेळाडू ज्वेल अँड्र्यूचाही संघात समावेश करण्यात आला आहे. त्याने गेल्या वर्षीच्या आयसीसी अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषकात उत्कृष्ट खेळ दाखवला होता.

या मालिकेसाठी शिमरन हेटमायरला (Shimron Hetmyer) संघात स्थान देण्यात आलेले नाही. याचे कारण म्हणजे तो सध्या आयपीएलमध्ये खेळत आहे. तो येथे राजस्थान रॉयल्सचा भाग आहे. राजस्थानचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी, तरीही हेटमायरला संघात स्थान मिळालेले नाही. कदाचित त्याचा कामाचा ताण लक्षात घेऊन विश्रांती देण्यात आली असेल. 2024च्या अखेरीस बांगलादेश आणि इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत यशस्वी झालेल्या बहुतेक खेळाडूंना वेस्ट इंडिज संघात स्थान मिळाले आहे.

वेस्ट इंडिज संघाचा संपूर्ण संघ- शाई होप (कर्णधार), ज्वेल अँड्र्यू, केसी कार्टी, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, जस्टिन ग्रीव्हज, आमिर जांगू, अल्झारी जोसेफ, शमार जोसेफ, ब्रँडन किंग, एविन लुईस, गुडाकेश मोती, शेरफेन रुदरफोर्ड, जेडेन सील्स, रोमारियो शेफर्ड

या वर्षीचा हा पहिलाच दौरा असेल. यामुळे सर्व संघांना 2027च्या विश्वचषकासाठी त्यांचा संघ तयार करण्यास मदत होईल. वेस्ट इंडिजचे मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी म्हणाले, आगामी 2027च्या विश्वचषकाच्या दृष्टीने या सामन्यांचे खूप महत्त्व आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील क्लीन स्वीप आणि इंग्लंडविरुद्धच्या विजयावरून असे दिसून येते की आम्ही योग्य संघ तयार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. तेथील परिस्थिती खूपच आव्हानात्मक असेल अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही अशी संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून आम्ही ज्या ब्रँडसाठी ओळखले जातो त्या ब्रँडचे क्रिकेट खेळू शकू.”

Comments are closed.