Western Railway – बोरीवली आणि राम मंदिर स्थानकादरम्यान रविवारी चार तासांचा जंबो ब्लॉक
ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर रविवारी जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. बोरीवली ते राम मंदिर स्थानकादरम्यान सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 दरम्यान अप फास्ट आणि पाचव्या मार्गिकेवर चार तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.
ब्लॉक कालावधीत बोरीवली आणि अंधेरी दरम्यानच्या सर्व अप जलद गाड्या अप धीम्या मार्गावर धावतील, तर अंधेरी आणि बोरीवली दरम्यानच्या पाचव्या मार्गिकेवरील सर्व गाड्या डाउन जलद मार्गावर धावतील. ब्लॉकमुळे काही अप आणि डाउन उपनगरीय रेल्वे सेवा रद्द केल्या जातील, तर काही अंधेरी आणि बोरिवली उपनगरीय गाड्या हार्बर लाईनवरून गोरेगावला वळवण्यात येतील.
Comments are closed.