पश्चिम रेल्वे मार्गावर 15 डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी वाढीव आसनांच्या लोकल फेऱया उपलब्ध होणार आहेत. 15 डब्यांच्या नव्या 17 फेऱया एप्रिलअखेर प्रवासीसेवेत दाखल होणार आहेत. वर्षअखेरपर्यंत 15 डब्यांच्या सेवेचा विस्तार वांद्रेपर्यंत करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना वांद्रे स्थानकातूनच 15 डब्यांच्या लोकल फेऱयांतून प्रवास करण्याचा पर्याय खुला होणार आहे.

पंधरा डबा लोकल चालवण्यासाठी यापूर्वी 12 डब्यांच्या लोकलचे तीन डबे काढण्यात येत. त्यानंतर कारशेडमध्ये याची जोडणी 12 डब्यांच्या लोकलला देण्यात येत होती. सलग पंधरा डब्यांच्या लोकलची बांधणी करून देण्यासाठी चेन्नईस्थित ‘इंटिग्रल कोच फॅक्टरी’कडे पाठपुरावा करण्यात आला होता. अंधेरी- वांद्रे धीम्या मार्गावर पंधरा डबा लोकल धावत नसल्याने विलेपार्ले, सांताक्रूझ फलाटांची लांबी वाढवण्यात येत आहे. त्यामुळे धीम्या मार्गावरही प्रवाशांना पंधरा डबा लोकलची सेवा मिळणार आहे.

लाखो मेट्रिक टन देशात येऊनही लोक रांगेतच

इराण युद्धामुळे देशात निर्माण झालेली एलपीजी टंचाईची समस्या मोदी सरकारला अजूनही सोडवता आलेली नाही. ‘ग्रीन संवी’ हे आणखी एक जहाज 46. 650 मेट्रिक टन एलपीजी घेऊन हिंदुस्थानकडे रवाना झाले आहे. एवढा एलपीजी देशात येऊनदेखील मुंबईत

नागरिकांना गॅस सिलिंडरसाठी रांगेत उभे राहावे लागत आहे.

Comments are closed.