Buddha Purnima 2025 : बुद्ध पौर्णिमेला या गोष्टी घरी आणणे असते शुभ
बुद्ध पौर्णिमा, ज्याला ‘बुद्ध जयंती’ किंवा ‘वेसाक’ असे म्हटले जाते. बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्माचा एक महत्त्वाचा सण आहे. वैशाख महिन्यात येणारी ही पौर्णिमा भगवान गौतम बुद्धांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. मान्यतेनुसार, वैशाख महिन्यातील पौर्णिमा हा गौतम बुद्धांचा जन्मदिवस होता आणि त्यामुळे या दिवसाला बुद्ध पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी पूजा, दान आणि ध्यान करणे शुभ असते. याशिवाय असेही सांगितले जाते की, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी घरी आणणे शुभ असते. या गोष्टींमुळे घरात सकारात्मकता वाढते आणि नशीबाचे दरवाजे उघडले जातात. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या गोष्टी घरी आणणे शुभ असते.
मुर्ती –
फेंगशुईनुसार गौतम बुद्धाची मूर्ती या दिवशी घरी आणणे शुभ असते. यामुळे घरात शांती, संतुलन राहते.
चांदीचे नाणे –

चांदीचे नाणे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी घरी आणल्याने लक्ष्मी देवी आणि श्री गणेशाची कृपा तुमच्यावर सदैव राहते.
पितळेचा हत्ती –

बुद्ध पौर्णिमेला घरात पिवळ्या हत्तीची मूर्ती आणणे शुभ असते. असं म्हणतात की, या शुभ मुहूर्तावर हत्तीची मूर्ती घरात आणल्याने घरातील द्रारिद्य नष्ट होते.
बांबू वनस्पती –

बांबू हा नशीब आणि समृद्धीचे प्रतिक असणारे रोप आहे. तुम्ही बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी हे रोप घरी आणू शकता.
मोर –

मोराचे पंख सकारात्मकतेचे प्रतिक असते. या दिवशी तुम्ही घरी मोरपंख घरी घेऊन आलात तर घरातील नकारात्मकता कमी होण्यास सुरूवात होईल.
हेही पाहा –
Comments are closed.