What did Prakash Abitkar say about malpractices in health department during Tanaji Sawant tenure


राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळातील 3 हजार 200 कोटी रुपयांच्या टेंडरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्थगिती देण्यात आली आहे. ज्यामुळे तानाजी सावंतांना मोठा धक्का बसला आहे.

मुंबई : राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळातील 3 हजार 200 कोटी रुपयांच्या टेंडरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्थगिती देण्यात आली आहे. ज्यामुळे तानाजी सावंतांना मोठा धक्का बसला आहे. याच मुद्द्यावरून आता विद्यमान सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी माध्यमांसमोर महत्त्वाचे मुद्दे मांडले आहे. तर सावंत यांच्या कार्यकाळातील टेंडर्समध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत मंत्री प्रकाश आबिटकर यांनी शनिवारी (ता. 1 मार्च) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. (What did Prakash Abitkar say about malpractices in health department during Tanaji Sawant tenure)

माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळातील टेंडरबद्दल बोलताना मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, एखाद्या कामात अनियमितता आढळल्यास त्याची चौकशी होणे आवश्यक आहे. यामध्ये कोणत्याही पक्षाचा संबंध नाही. तानाजी सावंत यांनी 30 ऑगस्ट 2024 रोजी पुण्यातील एका खासगी कंपनीला 3 हजार 190 कोटी रुपयांचे टेंडर मंजूर केले होते. या टेंडर्समध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय असून यामधील पारदर्शकता तपासली जात आहे, असे आबिटकरांकडून यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे आता एकाच पक्षातील आजी मंत्री यांनी माजी मंत्र्यांबाबत असे विधान केल्याने याबाबत तानाजी सावंत याबाबत नेमके काय बोलतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा… CM Fadnavis : आता पोलिसांवरही होणार कडक कारवाई, मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

यावेळी प्रसार माध्यमांसमोर मंत्री प्रकाश आबीटकर यांनी राज्यातील बालकांच्या आरोग्य तपासणी मोहिमेबाबत माहिती दिली. याबाबत ते म्हणाले की, राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून 0 ते 18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे. सुमारे 14 ते 15 लाख मुलांचे आरोग्य तपासले जाईल, यामध्ये गंभीर आजार असलेल्या मुलांवर तातडीने उपचार केले जातील. गरज पडल्यास शस्त्रक्रियाही केली जाणार आहे, अशी माहिती आबिटकरांकडून देण्यात आली. तर, कावळ्यांमध्ये बर्ड फ्लू, पण घाबरण्याचे कारण नाही अशा सूचना त्यांनी माध्यमांशी बोलतांना दिल्या. राज्यात बर्ड फ्लूचा धोका निर्माण झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. तसेच, कावळ्यांमध्ये बर्ड फ्लू आढळला असला तरी कोणत्याही व्यक्तीला या आजाराची लागण झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये. सध्या चिकन शॉप बंद करण्याची गरज नाही, मात्र आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे, असेही आबिटकर यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.



Source link

Comments are closed.