…दोन दिवस टेन्शनमध्ये होतो, मँचेस्टर कसोटीनंतर काय म्हणाला शुभमन गिल? बुमराहबद्दल दिली मोठी अ

इंग्लंड विरुद्ध भारत चौथी कसोटी अद्यतनः टीम इंडियाने मँचेस्टरमध्ये खेळलेला चौथा कसोटी सामना अनिर्णित ठेवला आहे. एकेकाळी असे वाटत होते की भारताला हा सामना वाचवणे खूप कठीण जाईल, पण ते त्यात अगदी सहज यशस्वी झाले. 300 पेक्षा जास्त धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर, दुसऱ्या डावात शून्य धावांवर भारताने दोन विकेट गमावल्या. तरीही, त्यांनी ज्या पद्धतीने पुनरागमन केले ते कौतुकास्पद आहे.

लॉर्ड्समध्ये पराभवाचा सामना केल्यानंतर, टीम इंडियाने मँचेस्टरमध्ये पुनरागमन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. यामुळेच जसप्रीत बुमराहला सलग दुसरा सामना खेळावा लागला. मँचेस्टर कसोटीत बुमराहची कामगिरी फारशी प्रभावी नव्हती. आता कर्णधार शुभमन गिलकडून ओव्हल कसोटीतील त्याच्या खेळण्याबाबत अपडेट दिली.

मँचेस्टर कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर भारताचा कर्णधार शुभमन गिल काय म्हणाला?

शुभमन गिल म्हणाला की, फलंदाजीतून मिळालेल्या कामगिरीबद्दल मी खूपच समाधानी आहे. मागील दोन दिवस आम्ही प्रचंड टेन्शनमध्ये होतो. अशा परिस्थितीत खेळताना खेळपट्टीकडे लक्ष न देता फक्त प्रत्येक चेंडूवर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं होतं. पाचव्या दिवसाचा खेळ, प्रत्येक चेंडू नवीन काय तरी करत होता. त्यामुळे आम्ही ठरवलं की एकेक चेंडू खेळायचा आणि सामना शक्य तितका शेवटपर्यंत न्यायचा.

जडेजा आणि सुंदरबद्दल काय म्हणाला शुभमन गिल?

तो म्हणाला की, जडेजा आणि सुंदरने जबरदस्त फलंदाजी केली. ते दोघंही नव्वदीच्या जवळ होते आणि त्यांनी शतके करावी अशीच आमची इच्छा होती. प्रत्येक सामना शेवटच्या सत्रापर्यंत जातोय, हेच दाखवतं की या मालिकेत खूप काही शिकायला मिळतंय. संघ म्हणून आम्ही यामधून खूप काही शिकलो आहोत. आशा आहे की पुढचा सामना जिंकून आम्ही मालिका बरोबरीत आणू.

अनेक फलंदाज सेट होऊन झाले आऊट…

पुढे तो म्हणाला की, पहिल्या डावात आम्ही चांगला स्कोअर उभारला, पण आमचे अनेक फलंदाज सेट होऊनही मोठी खेळी करू शकले नाहीत. अशा खेळपट्ट्यांवर जर एक-दोन फलंदाज चांगले खेळले, तर सामना पूर्णपणे आपल्या बाजूला वळवता येतो. पण, पहिल्या डावात तसं घडू शकलं नाही. पण दुसऱ्या डावात आम्ही ते साध्य केलं याचं समाधान आहे.

ओव्हल कसोटीमध्ये बुमराह खेळणार?

बुमराहबद्दल शुभमन गिल म्हणाला की, बुमराह ओव्हल टेस्टमध्ये खेळेल की नाही, हे अजून पाहावं लागेल. आणि टॉस कोण जिंकलं याचं मला काही देणं-घेणं नाही, फक्त सामना आपण जिंकावा हीच इच्छा आहे.

आणखी वाचा

Comments are closed.