बॅटने गोळीबारसारखी ॲक्शन करणारा साहिबजादा फरहान पाकिस्तानमध्ये पोहोचताच नागरिकांनी काय काय केलं
साहिबजादा फरहान विरुद्ध पाक आशिया कप 2025: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आशिया चषकातील (Asia Cup Trophy 2025) जेतेपदाच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. भारताचा डाव सुरुवातीच्या काही षटकांत डगमगला होता. परंतु तिलक वर्माच्या (Tilak Verma) जबरदस्त खेळीनं भारताचा विजयाचा मार्ग सोपा झाला. भारताने 5 विकेट्सने पाकिस्तानचा पराभव केला. या विजयासह भारताने आतापर्यंत नवव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. दरम्यान, आशिया चषकमध्ये भारत पाकिस्तानमध्ये अनेक वाद झाले, त्यापैकी एक म्हणजे साहिबजादा फरहानने (Sahibzada Farhan Gun Celebration) अर्धशतक झळकावताच बॅटनं AK 47 प्रमाणे गोळीबाराची ॲक्शन केलेला वाद होता.
🚨 अभिषेक शर्माने आशिया कप 2025 च्या सुपर चौकारांमध्ये साहिबजाद फरहानचा झेल सोडला. #Asiacup2025 #Indvpak pic.twitter.com/dd96kd5cus
– आयसीसी एशिया क्रिकेट (@iccasiacricket) 21 सप्टेंबर, 2025
साहिबजादा फरहान पाकिस्तानमध्ये पोहोचताच नागरिकांनी काय काय केलं?
आशिया चषक 2025 दरम्यान भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये अनेक वाद झाले. त्यापैकी सर्वाधिक चर्चेत राहिलेला क्षण म्हणजे पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहानचा अर्धशतकानंतरचा सेलिब्रेशन (Sahibzada Farhan Gun Celebration). फलंदाजीनंतर त्याने बॅटला AK-47 रायफलप्रमाणे खांद्यावर घेत गोळीबाराची ॲक्शन केली होती. या ॲक्शनवरून सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा रंगली होती. या वादानंतरही फरहानने संपूर्ण स्पर्धेत दमदार खेळ करून दाखवला. आशिया चषकात तो तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
स्पर्धा संपल्यानंतर जेव्हा फरहान आपल्या गावी चरसद्दा (Charsadda) येथे परतला, तेव्हा त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. स्थानिक नागरिकांनी त्याच्यावर फुलांची उधळण केली, त्याला खांद्यावर उचलून जल्लोष केला. फरहानसाठी झालेला हा उत्साहवर्धक प्रतिसाद पाकिस्तानमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर त्याच्या स्वागताचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत.
21 सप्टेंबर रोजी भारताविरुद्धच्या सुपर फोर सामन्यात साहिबजादा फरहानने 45 चेंडूत 58 धावा केल्या होत्या, ज्यामध्ये पाच चौकार आणि तीन षटकार मारले होते. पण, साहिबजादच्या गोळीबार ॲक्शननंतर, भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानी खेळाडूंनी सामना सहा विकेटने गमावला.
अंतिम सामना झाल्यानंतर ट्रॉफीवरुन मैदानात जोरदार राडा
आशिया चषक स्पर्धेच्या 28 सप्टेंबर झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. मात्र या सामन्यानंतर दुबईतील मैदानात ट्रॉफीवरुन जोरदार राडा झाला. भारत आणि पाकिस्तान संघांमधल्या आशिया चषकाच्या फायनलइतकाच या स्पर्धेचा तासाभरापेक्षा जास्त वेळ लांबलेला पारितोषिक वितरण सोहळाही तितकाच नाट्यमय ठरला.
आशियाई क्रिकेट परिषद म्हणजे एसीसीचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वीच्या (Mohsin Naqvi) हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास भारतीय संघानं स्पष्ट नकार दिला होता. मोहसीन नक्वी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि एक प्रभावशाली पाकिस्तानी राजकारणी आहेत. संपूर्ण जगासमोर अपमानित झाल्यानंतर, पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वीने आशिया कप ट्रॉफी भारताला सादर करण्यास सहमती दर्शविली आहे. मात्र ट्रॉफी देण्यासाठी एक अटही मोहसीन नक्वीने ठेवली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.