Food : पॅकेज फूडवरील लाल, हिरव्या रंगाचा अर्थ काय?
भारतीय खाण्या-पिण्याचे शौकिन आहेत. काहींना चमचमीत, काहींना गोड पदार्थ खायला आवडतात. काही लोक खाण्याच्याबाबतीत शुद्ध शाकाहारी तर काही मांसाहारी पदार्थ खाणारे असतात. मांसाहारी पदार्थांमध्येही काही अंडी खातात तर काही अंडी खात नाहीत. हल्ली तर व्हेगन हा नवा प्रकाराही पाहायला मिळतो. व्हेगन असणारे लोक दूध, तूप, अंडी खात नाहीत तर केवळ प्लांट बेस्ड डाइट करतात. हल्ली पदार्थ बनवण्याऐवजी पॅकेज फूडला अधिक पसंती दिली जाते. पण, पॅकेज फूड खरेदी करताना तुम्ही काही गोष्टी व्यवस्थित पाहायला हव्यात. पॅकेज फूडवर विविध रंगाच्या खूणा असतात, ज्यांचा अर्थ असतो. केवळ डिझाइन म्हणून त्या देण्यात येत नाहीत. या खूणा आपल्याला पदार्थ कसा आहे मांसाहारी आहे, व्हेगन आहे का? याची माहिती देतं. आज आपण जाणून घेऊयात Packaged Food वरील लाल, हिरव्या, पिवळ्या रंगाचा अर्थ काय
रंग आणि त्याचा अर्थ –
लाल रंग
लाल रंग हा पदार्थ मासांहारी असल्याची माहिती देते. जर तुम्ही शाकाहारी असाल तर ज्या पदार्थांवर लाल रंगाचा डॉट आहे, असे पदार्थ खाणे टाळायला हवे.
हिरवा रंग (Green Colour)
पॅकेज फूडवर हिरवा रंग असेल तर पदार्थ पूर्णपणे शाकाहारी असल्याचे सांगितले जाते. या पदार्थात मांस, अंडी आणि इतरो कोणत्याही प्राणीजन्य उत्पादन नाही.
निळा रंग (Blue Colour)
निळा रंग जर फूड पॅकेजवर असेल तर हे प्रॉडक्ट औषधांशी संबंधित आहे, हे समजावे. हे प्रॉडक्ट डॉक्टरांना न विचारता खाऊ नये.
पिवळा रंग (Yellow Colour)
पॅकेज फूडवर जर पिवळ्या रंगाची खूण असेल तर त्यात अंड आहे असे समजावे. तुम्ही जर अंडी खात नसाल तर हे प्रॉडक्ट खाऊ नये.
काळा रंग (Black Colour)
जर पॅकेज फूडवर काळ्या रंगाची खूण असेल तर त्यात मोठ्या प्रमाणात केमिकल्स असल्याचे दर्शवते. हे पदार्थ जास्त काळ खराब होऊ नये म्हणून तसेच त्याचा रंग आणि चव वाढवण्यासाठी यात केमिकल्सचा वापर केला जातो. असे पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. डॉक्टरांच्या मते, काळ्या रंगाची खूण असलेले पदार्थ पचनसंस्था, यकृत आणि किडनीवर परिणाम करू शकतात.
काय काळजी घ्याल?
कोणताही पदार्थ खरेदी करताना पॅकेटवरील रंगीत खूण अवश्य पाहावी. विशेष करून लहान मुलांचे स्नॅक्स खरेदी करताना याची दक्षता घ्यावी.
हेही पाहा –
Comments are closed.