Asia Cup: आशिया कपमध्ये शुबमन गिलचं रेकॉर्ड नेमक कसं आहे? जाणून घ्या आकडेवारी काय सांगते
आशिया कप 2025 (Asia Cup 2025) ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. शुबमन गिलला (Shubman gill) टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे. गिल याआधी 2023 च्या वनडे आशिया कपचा भाग राहिला होता. ही फक्त दुसरी वेळ असेल, जेव्हा तो आशिया कपमध्ये खेळताना दिसेल. मात्र, पहिल्यांदाच तो आशिया कपच्या टी20 फॉरमॅटमध्ये खेळणार आहे.
2023 च्या आशिया कपमध्ये गिलनं जबरदस्त कामगिरी केली होती. तो संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. त्या वेळी स्पर्धा वनडे फॉरमॅटमध्ये झाली होती. गिलनं 6 सामन्यांत तब्बल 302 धावा केल्या होत्या, त्याची सरासरी जवळपास 76 होती. त्याने एका शानदार शतकासह दोन अर्धशतकंही झळकावली होती.
आतापर्यंत गिलनं भारतासाठी 21 टी20 सामने खेळले आहेत. यात त्याने 30.42 च्या सरासरीनं 578 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 3 अर्धशतकं आणि 1 शतक आहे. गिलचा स्ट्राइक रेट 139.28 इतका आहे.
भारतीय संघ आपल्या स्पर्धेतील मोहिमेला सुरवात 10 सप्टेंबरला यूएईविरुद्ध सुरू करेल. 14 सप्टेंबरला भारताचा सामना पाकिस्तानशी (IND vs PAK) होईल. ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना भारताचा ओमानविरुद्ध असेल, हा सामना 19 सप्टेंबरला खेळला जाईल.
Comments are closed.