वनडे क्रमवारी जाहीर; आयआयसीसीच्या यादीतून ‘हिटमॅन’ अन् ‘किंग’चा सुपडा साफ, पाहा लिस्ट

आयसीसी नवीनतम एकदिवसीय क्रमवारीत: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ताज्या वनडे क्रमवारीची घोषणा केली. या नव्या यादीनं क्रिकेटप्रेमींना अक्षरशः धक्का बसला आहे. वनडे क्रिकेटमधील दोन दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली अचानक ICC च्या वनडे क्रमवारीतून गायब झाले आहेत. याआधी जाहीर झालेल्या वनडे क्रमवारीत रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर होता, तर विराट कोहलीने चौथ्या स्थानी होता. पण 20 ऑगस्टला जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत हे दोघे टॉप-100 मधूनच हद्दपार झाले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

या दोघांनी शेवटचा वनडे सामना 9 मार्च 2025 रोजी न्यूझीलंडविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये खेळला होता. त्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला 4 गडी राखून हरवत ट्रॉफी जिंकली होती.

आयसीसीचा नियम काय सांगतो?

विराट आणि रोहित अजूनही आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये सक्रिय असून निवृत्तीची घोषणा त्यांनी केलेली नाही. त्यामुळे त्यांची नावे अचानक रँकिंगमधून गायब होणे, हा मोठा धक्का आहे. पण, आयसीसीच्या नियमांनुसार, जर एखाद्या खेळाडूने ठराविक कालावधीत (टेस्टसाठी 12 ते 15 महिने आणि वनडे व टी20 साठी 9 ते 12 महिने) एकही सामना खेळला नसेल, तर त्याला टॉप-100 रँकिंगमधून वगळले जाऊ शकते.

याशिवाय, एखादा खेळाडू एखाद्या फॉरमॅटमधून किंवा पूर्णपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला, तरीही त्याला कायमस्वरूपी रँकिंगमधून हटवले जाते. उदाहरणार्थ, महेंद्रसिंग धोनीने 2014 साली टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तेव्हा त्याला टेस्ट रँकिंगमधून काढून टाकण्यात आलं, पण तो वनडे रँकिंगमध्ये कायम राहिला. याच कारणामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा हे सध्याच्या टेस्ट व टी20 रँकिंगमध्ये दिसत नाहीत. 2024 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्यांनी टी20 फॉरमॅटला रामराम ठोकला आणि यावर्षी मे महिन्यात टेस्ट क्रिकेटलाही निरोप दिला.

शुभमन गिल पहिल्या क्रमांकावर

ताज्या क्रमवारीनुसार शुभमन गिल 784 गुणांसह जगातील क्रमांक 1 वनडे फलंदाज ठरला आहे. त्याच्या खालोखाल पाकिस्तानचा बाबर आझम 739 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा श्रेयस अय्यर 704 गुणांसह सहाव्या स्थानावर असून टॉप-10 मधील एकमेव भारतीय आहे.

विराट-रोहित शर्मा आता कधी खेळणार?

आता विराट कोहली आणि रोहित शर्मा भारतासाठी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर वनडे मालिकेत खेळताना दिसतील. 19 ऑक्टोबरपासून पर्थ येथे या मालिकेची सुरुवात होईल. मात्र, वृत्तानुसार निवड समिती 2027 च्या वनडे वर्ल्ड कपच्या योजनेत या दोघांना फारसं स्थान देत नाही, अशी चर्चा आहे.

केशव गोलंदाजीत ‘महाराज’

गोलंदाजांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडेत त्याने 5 विकेट घेतली होती. त्याच्या 687 गुणांमुळे तो दोन स्थानांनी वर जाऊन अव्वल स्थानावर पोहोचला. श्रीलंकेचा महेश तीक्ष्णा दुसऱ्या तर भारताचा कुलदीप यादव तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.

हे ही वाचा –

शुबडेन गिल: बीसीसीने अनेक दगड ठार मारले आहेत, बीसीसीने अनेक दगड आणि कुणाकुनाचे रत्न मारले आहेत?

आणखी वाचा

Comments are closed.