ICCच्या नव्या वेळापत्रकाचा भारतीय सामन्यांवर काय होणार परिणाम? जाणून घ्या, वनडे वर्ल्डकप सामने केव्हा आणि कुठे खेळले जाणार

आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कपची सुरुवात 30 सप्टेंबरपासून होणार असून अंतिम सामना 2 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. पण वर्ल्ड कपचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आयसीसीने त्यात एक महत्त्वाचा बदल केला आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणारे सामने आता मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये घेतले जाणार आहेत. बंगळुरू भगदाड प्रकरणानंतर कर्नाटक सरकारने चिन्नास्वामी स्टेडियममध्ये वर्ल्ड कपचे आयोजन थांबवले आहे. या बदलामुळे भारताच्या दोन सामन्यांवर परिणाम झाला असून वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

आयसीसीने नवे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर टीम इंडियाच्या या दोन्ही सामन्यांच्या तारखा बदलल्या नाहीत, पण ठिकाण बदलले आहे. भारताचे लीग स्टेजमध्ये एकूण 7 सामने होणार आहेत.

पहिला सामना 30 सप्टेंबर दिवशी भारत विरुद्ध श्रीलंका, गुवाहाटी येथे होणार आहे, दुसरा सामना 5 ऑक्टोबर, भारत विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो येथे होणार आहे. तिसरा सामना 9 ऑक्टोबर, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. चौथा सामना 12 ऑक्टोबर, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, विशाखापट्टणम
पाचवा सामना 19 ऑक्टोबर, भारत विरुद्ध इंग्लंड, इंदौर येथे होणार आहे. सहावा सामना 23 ऑक्टोबर, भारत विरुद्ध न्यूझीलंड, नवी मुंबई तर, सातवा सामना 26 ऑक्टोबर रोहित भारत विरुद्ध बांगलादेश, नवी मुंबई येथे होणार आहे.

आयसीसी महिला वनडे विश्वकप पहिला उपांत्य सामना 29 ऑक्टोबरला गुवाहाटी किंवा कोलंबो येथे खेळवला जाईल. दुसरा उपांत्य सामना आधी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार होता, पण आता तोही नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये होईल. या विश्वकपचा अंतिम सामना देखील नवी मुंबई किंवा कोलंबो यापैकी एका ठिकाणी खेळवला जाणार आहे.

पाकिस्तानची टीम जर उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाली, तर नॉकआउट सामन्यांपैकी एक सामना कोलंबो येथे होईल. तसेच पाकिस्तानची टीम उपांत्य सामना जिंकून अंतिम फेरीत पोहोचली, तर विश्वकपचा अंतिम सामना श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे खेळवला जाईल. या विश्वकपचे आयोजन भारत करत आहे, पण पाकिस्तानचे सर्व सामने कोलंबोमध्ये ठेवण्यात आले आहेत.

Comments are closed.