फोरफिट म्हणजे काय? ज्याच्या आधारे पाकिस्तानने ICC समोर ठोकलाय दावा; भारत-पाक सामन्यावर टांगती तलवार
टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये बांगलादेशच्या सहभागाबाबत मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांनी भारतात येऊन खेळण्यास नकार दिला होता. यामुळे आयसीसीने (ICC) बांगलादेशला स्पर्धेतून हटवून त्यांच्या जागी स्कॉटलंडला संघात स्थान दिले. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीला धमकी दिली की ते टी20 वर्ल्ड कप खेळणार नाहीत. आता अशा बातम्या येत आहेत की, भारताच्या विरोधात होणारा सामना ‘फोरफिट’ (Forfeit) करण्यास पाकिस्तान तयार आहे. या महामुकाबल्यावर सध्या संकटाचे सावट पसरले आहे. अशा वेळी ‘फोरफिट’ म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला असेल.
जर पाकिस्तानने भारता विरुद्धचा महामुकाबला ‘फोरफिट’ केला, तर पाकिस्तानचे दोन गुण कापले जातील. हा पाकिस्तानचा पराभव मानला जाईल आणि भारताला दोन गुण मिळतील. क्रिकेटच्या इतिहासात अनेकदा संघांनी आपले सामने फोरफिट केले आहेत, ज्याचा फायदा विरोधी संघाला गुण मिळण्यासाठी झाला आहे. फोरफिटचा नियम अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे आणि जर परिस्थिती सुधारली नाही, तर चाहत्यांना टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारत-पाकिस्तान सामना पाहायला मिळणार नाही.
Comments are closed.