भुरी बाई: आदिवासी चित्रकार भुरी बाई

भूरी बाई या प्रसिद्ध भारतीय भिल्ल कलाकार आहेत. त्यांनी आदिवासी चित्रकलेद्वारे जगभरात एक ठसा उमटवला आहे. त्यांनी त्यांच्या कलेतून भिल्ल समाजाची परंपरा आणि संस्कृती जगासमोर मांडली आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांनी 2021 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. उपजीविकेसाठी त्या मजुरीची कामे करायच्या. त्यांचा चित्रकार होण्याचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. जाणून घेऊयात, भिल्ल चित्रकार भुरी बाई यांच्याविषयी

जन्म

भूरी बाई यांचा जन्म मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील पिटोल गावात झाला आहे. त्या भिल्ल समुदायातील आहेत. भिल्ल समाज हा देशातील सर्वात मोठा आदिवासी समुदाय आहे.

चित्रकलेतील योगदान –

पांरपरिक भिल्ल चित्रकलेला भूरी बाई यांनी नवी ओळख दिली आहे. लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची प्रचंड आवड होती. त्या लहान असताना समाजातील लोक भिंतीवर चित्र रंगवताना पाहायच्या. तीच परंपरा त्यांनी पुढे सुरू ठेवली. भूरी बाई यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाकिची असल्याने त्यांना शिक्षण घेता आले नाही.

येथून सुरू झाला कलेचा प्रवास –

भूरी बाई यांच्या कलेचा प्रवास भारत भवन भोपाल येथून सुरू झाल्याची माहिती आढळते. त्यानुसार, 1980 च्या दशकात जगदीश स्वामीनाथन या चित्रकाराने त्यांच्या कलेची दखल घेतल्याचे सांगण्यात येते. त्यावेळी भुरी बाई भारत भवनमध्ये सफाई कामगार म्हणून काम करायच्या. तेथे त्यांनी आपल्या कलेबद्दल चित्रकार स्वामीनाथन यांना सांगितले. त्यावर स्वामीनाथन यांनी हातात कागद आणि ब्रश देत तुझ्या शैलीत कागदावर काढून दाखवण्यास सांगितले आणि भूरी बाईंनी काढले देखील. तेव्हापासून भूरी बाईंनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या चित्रातून भूरी बाई यांनी भिल्ल आदिवासींच्या पारंपरिक कलेला राष्ट्रीय आणि आतंरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली आहे. त्यांनी या चित्रातून आदिवासी संस्कृती, परंपरा, देवते, उत्सव, निसर्गाविषयी माहिती सांगितली आहे.

सन्मान –

  • पद्मा श्री पुरस्कार (2021)
  • मध्य प्रदेश शासनाचा शिखर सन्मान

परदेशात चित्रांचे प्रदर्शन –

भूरी बाई यांच्या चित्रकलेची प्रदर्शने अमेरिका, इंग्लंड, जपान अशा विविध देशात झाली आहेत. तर अनेक चित्रे संग्रहालयांत जतन करून ठेवले आहे.

भुरी बाई यांचे संपूर्ण कार्य पाहता त्यांचे कार्य इतर महिलांसाठी प्रेरणादायी नक्कीच आहे. त्यांनी आदिवासी पारंपरिक कलेला जागतिक ओळख दिली असून त्यांच्या या कार्यामुळे आदिवासी लोककला आणि चित्रशैलीचे संवर्धन झाले आहे, एवढे मात्र नक्की..

 

 

हेही पाहा –

Comments are closed.